‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यादिवशी ओटीटीवर पाहता येणार | पुढारी

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यादिवशी ओटीटीवर पाहता येणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित स्वातंत्र्यवीर सावरकर ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती असून स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट वर्ल्ड डिजीटल प्रीमियर होणार आहे. प्रमुख भूमिकेत स्वत: रणदीप हुड्डा तर सावरकरांची पत्नी यमुना बाई सावरकर म्हणून अंकिता लोखंडे कलाकार आहेत. हिंदी आणि मराठी भाषेत चित्रपट पाहता येईल.

रणदीप हुड्डा म्हणाला, “भारतीय सशस्त्र क्रांतीतील सर्वात प्रभावशाली क्रांतिकारकाला त्यांच्या १४१ व्या जयंतीला, २८ मे’ यापेक्षा आदरांजली वाहण्यासाठी यापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो. या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केल्यानंतर मी या प्रेरणादायी नायकाबद्दल बरेच काही शिकलो हे मला मान्य करावेच लागेल. या महान क्रांतिकारकाचा वारसा दफन करण्यासाठी लोकप्रिय संस्कृतीत पसरलेल्या खोट्या कथनाचा प्रतिकार करण्यासाठी मला हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करायचा आहे. असा समृद्ध आणि प्रेरणादायी वारसा मागे टाकत या प्रभावशाली परंतु दुर्भागी क्रांतिकारकाचे जीवन पडद्यावर जगायला मिळणे हा माझ्यादृष्टीने एक सन्मान होता. भारतीय इतिहासातील लपलेले अध्याय जाणून घेण्यासाठी आणि तो योग्य वीर आहे की नाही हे स्वतः ठरवण्यासाठी मी प्रत्येक भारतीयाला हा चित्रपट पाहण्याची विनंती करेन”.

अंकिता लोखंडे म्हणाली, “महान वीर सावरकरांची पत्नी यमुनाबाई व्यक्तिरेखा उभी करण्याचा अनुभव अभिनेत्री म्हणून समाधानकारक होता. कारण मी यापूर्वी अशाप्रकारची पात्र रंगवलेली नाही आणि त्यांची कथा जिवंत करणे माझ्यासाठी खरोखरच सन्माननीय बाब होती. चित्रीकरणादरम्यान मला यमुनाबाईबद्दल जाणून घेण्याची संधी मिळाली आणि तिने तिच्या पतीला दाखवलेली ताकद आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेले. ती असल्याने मला खूप काही शिकायला मिळाले. या भूमिकेमुळे मला अभिनेत्री म्हणून वाढण्यास नक्कीच मदत झाली आहे आणि माझ्या आगामी सिनेमात अशा खंबीर महिलांची भूमिका साकारण्यासाठी अशा प्रकारच्या अधिक संधी मिळतील ही आशा मला वाटते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by ZEE5 (@zee5)

अधिक वाचा-

Back to top button