प्रतीक्षेत राहा; Pushpa 2 च्या दुसऱ्या गाण्यात श्रीवल्ली थिरकणार? | पुढारी

प्रतीक्षेत राहा; Pushpa 2 च्या दुसऱ्या गाण्यात श्रीवल्ली थिरकणार?

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘पुष्पा 2’ चित्रपट यादिवशी रिलीज होणार आहे. चित्रपटाविषयी फॅन्स खूप उत्सुक आहेत आणि चित्रपटगृहात रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज झाले होते. आता चित्रपट निर्मात्यांनी दुसरे गाणे रिलीज करण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी बुधवारी सोशल मीडियावर नव्या गाण्याचे टीजर पोस्टर जारी केले आहेत. पोस्टर पाहिल्यानंतर लोक वेगवेगळा कयास लावत आहेत. गुरुवारी चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाचे दुसरे सिंगल टीझर शेअर केला आहे. या ट्रॅकमध्ये श्रीवल्ली (रश्मिका मंदाना) आणि सामी (पुष्पा राज उर्फ ​​अल्लू अर्जुन) दोघे दिसणार आहेत. हे गाणे २९ मे रोजी रिलीज होईल आणि पुष्पा -२ हे गाणे १५ ऑगस्ट, २०२४ रोजी रिलीज होईल.

पुष्पा 2 का दुसरे गाणे श्रीवल्लीसोबत?

सोशल मीडियावरील पोस्टनुसार, ‘अनटायटल गाण्यात श्रीवल्लीची भूमिका दाखवण्यात आली आहे. हा ट्रॅक ‘पुष्पा : द राइज’ च्या ‘सामी सामी’ चे हिट ट्रॅक मानले जात आहे. पोस्टरमध्ये बॅकग्राउंडमध्ये पर्पल, पिंक आणि येलो शेड्स आहेत, ज्यामध्ये मुद्रेत एका महिला हात दिसत आहे. हा श्रीवल्लीचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

काय म्हणाले पुष्पा २ चे निर्माते?

सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्ट कॅप्शनमध्य़े निर्मात्यांनी लिहिलं, ’पहिल्या गाण्यात ‘पुष्पा पुष्पा’मध्ये अल्लू अर्जुनची धमाल पाहायला मिळाली. यावेळी दुसऱ्या गाण्यात श्रीवल्ली सोबत सामी दोघे मिळून धुमाकूळ घालतील. या सीक्वलमध्ये रश्मिका मंदाना आणि फहद फासिल देखील मुख्य भूमिकेत आहेत.

हेदेखील वाचा-

Back to top button