कॅटरीना-विक्की कौशलच्या लव्ह स्टोरीला अशी झाली हाेती सुरुवात - पुढारी

कॅटरीना-विक्की कौशलच्या लव्ह स्टोरीला अशी झाली हाेती सुरुवात

पुढारी ऑनलाईन डेस्क

कॅटरीना-विक्की कौशल हे लव्ह बर्ड्स सध्या चर्चेत आहे. मागील वर्षी दोघे एकमेकांना डेट करत असल्याची माहिती समोर आली. रणबीर कपूरसोबत ब्रेकअपनंतर कॅटरीना कैफ सिंगलहुड एन्जॉय करत होती. दरम्यान, तिची विक्‍की कौशलबराेबर मैत्री वाढली. त्यामुळे अनेकांनी कयास लावणे सुरू केलं की, ‘काही तरी शिजत आहे!’ तुम्हाला माहितीये का, कॅटरीना-विक्की कौशल यांच्या लव्हस्टोरीला कशी सुरुवात झाली?

‘उरी: द सर्जिकल स्‍ट्राईक’नंतर कौशलच्या स्‍टारडमचा आलेख वाढला.  कौशल अनेकवेळा लपूनछपून कॅटच्या घरी भेटायला गेला; परंतु, कॅमेरापासून तो वाचला नाही. अभिनेता हर्षवर्धन कपूरने पुष्‍ट‍ी केली की, दोघे एकत्र आहेत. तुम्हाला माहितीये का, दोघांच्या अफेअरची सुरुवात कशी झाली?

Katrina Kaif And Vicky Kaushal's Wedding Dates Finally Out, The Couple To Have A Catholic Wedding

एक चांगला vicky kaushal पाहून लग्न का करत नाहीस?

हे प्रकरण आहे २०१९ मधील एका पुरस्कार सोहळ्यातील. कॅट जेव्हा पुरस्कार घेण्यासाठी स्टेजवर गेली. तेव्‍हा विक्की कौशल सूत्रसंचालन करत उभा होता. त्याने कॅटला छेडलं, तो म्हणाला-‘तू एखाद्या चांगल्या विक्की कौशलला  ( vicky kaushal ) शोधून लग्न का करत नाहीस.’ यावर कॅट हसू लागली. यावेळी पुरस्कार सोहळ्यात सलमान खान बहिण अर्पितासोबत बसले होते. ही गोष्ट ऐकून तिला हसू आलं. पण, ही गोष्ट इथेचं थांबली नाही.

Hilarious memes on Vicky Kaushal and Katrina Kaif that are going viral | Filmfare.com

.. त्याने सलमानसमोर केलं प्रपोज

त्याने कॅटला थेट प्रपोज केलं. तो म्हणाला, ‘लग्नाचे सीझन सुरू आहे. तर मीही असा विचार केला की, तुला एकदा विचारावं.’ यावर कॅट म्हणाली, काय? उत्तरादाखल विक्की लाजत म्हणाला, ‘माझ्याशी लग्न करशील?’ कॅट पटकन म्हणाली, ‘हिंमत नाही.’

असो, स्टेजवर मस्ती मूडमध्ये कॅटने बोलून टाकलं. पण, रिअल लाईफमध्ये दोघांच्या नात्याला सुरूवात झाली. यानंतर भेटणं सुरू झालं. दोघंही एकमेकांना डेट करणं सुरू केलं.

Katrina Kaif-Vicky Kaushal wedding: Mehendi, Sangeet, Reception – here's what the bride and groom will wear on their big Bollywood do

करणच्या शोतून झाली अशी सुरुवात

ही गोष्ट २०१८ ची आहे. करण जोहरचा टीव्ही शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये कॅटने हजेरी लावली होती. तेव्हा करणने मिश्किलपणे विचारलं होतं की, तुझ्यासाबोत कोमत्या अभिनेत्याची जोडी चांगली वाटते. तेव्हा कॅटने vicky kaushal चं नाव घेतलं होतं.

एक वर्षांनंतर पक्‍की झाली मैत्री

कौशल याने ‘मसान’ आणि ‘रमन राघव 2.0’ यासारख्या चित्रपटातून कौशलने बॉलिवूडमध्ये लोकप्रियता मिळवली. ‘उरी’ रिलीज झाल्यानंतर त्याला आणखी लोकप्रियता मिळाली.

हेही वाचलं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

 

View this post on Instagram

 

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

Back to top button