शमिता शेट्टी-देवोलीना यांच्यातील वाद हाणामारी पर्यंत पोहोचला (व्हिडिओ) | पुढारी

शमिता शेट्टी-देवोलीना यांच्यातील वाद हाणामारी पर्यंत पोहोचला (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क

बिग बॉस सीझन १५ च्या घरात दोन-तीन दिवसांपूर्वीचं शमिता शेट्टी-देवोलीना भट्टाचार्जी यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. या भांडणात शमिता शेट्टी बेशुध्द झाली. आता शमिता शेट्टी-देवोलीना यांच्यातील वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याचे समोर आलंय. घरात व्हीआयपी सदस्यांची एन्ट्री झाल्याने सातत्याने शोमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. आता शमिता शेट्टी-देवोलीना यांच्यात मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचलं.

Image

राखी सावंत, भट्टाचार्जी-रश्मी देसाईसहित व्हीआयपी कंटेस्टेंट्सची जेव्हा घरात एन्ट्री झाली. तेव्हा नॉन व्हीआयपी कंटेस्टेंट्स -करण, तेजस्वी, उमर, निशांत भट्ट सह सर्व स्पर्धकांना धोका होता. रोज कुणाच्या ना कुणाचं तरी भांडणं पहायला मिळतात. एक टास्क दरम्यान, शेट्टी-भट्टाचार्जी यांच्यात झडप झाली.

Bigg Boss 14 Promo: Devoleena Bhattacharjee create havoc after Arshi Khan comments on her family, damages BB's property and hurts herself
Devoleena Bhattacharjee

शेट्टीची बिघडली तब्येत

खरतरं, व्हीआयपी सदस्य, नॉन व्हीआयपी सदस्यांना इम्युनिटी देण्यासाठी अजिबात तयार होत नाहीत. भट्टाचार्जी ती सदस्य आहे, तिच्यासाठी प्राईज मनीचे टास्क रद्द करण्यात आलं होतं. तिचा हा व्यवहार नॉन व्हीआयपी कंटेस्टेंट्सना अजिबात आवडला नाही. यावेळी टास्कच्या दरम्यान शेट्टी-भट्टाचार्जी यांच्यात वाद झाला. त्यानंतर शेट्टीची तब्येत खूप बिघडली.

Image

भांडणात झाली बेशुध्द

शेट्टी-भट्टाचार्जी यांच्यातील वाद इतका वाढला की दोघींमधील भांडण मारहाणीपर्यंत गेलं. दोघींनीही एकमेकींना अपशब्द बोलले. घरातील सदस्यांनी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचवेळी शेट्टी अचानक बेशुध्द झाली. त्यानंतर करण कुंद्राने तिला उचलून मेडिकल रूममध्ये नेलं.

बिग बॉसवर ओरडली शेट्टी

या प्रकारानंर शेट्टी बिग बॉसवर ओरडली. तिने अट घातली की, जोपर्यंत बिग बॉस तिला कंफेशन रूममध्ये बोलवत नाहीत, तोपर्यंत ती मेडिकल रूममध्ये जाणार नाही. यानंतर तिला बिग बॉसने कंफेशन रूममध्ये बोलावलं. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले.

Back to top button