पुढारी ऑनलाईन डेस्क : Ind vs NZ Mumbai Test : मुंबईतील वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा दुसरा दिवस रोमांचकारी राहिला. पहिल्या डावात टीम इंडिया ३२५ धावांवर बाद झाली. पाहुण्या न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज एजाज पटेलने डावातील सर्व १० बळी घेत इतिहास रचला. तर दुसरीकडे ३२५ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांची दमछाक झाली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट घेत पाहुण्या संघाचा अवघ्या ६२ धावांत गाशा गुंडाळला. त्यामुळे भारताला २६३ धावांची आघाडी मिळाली. टीम इंडियाने न्यूझीलंडला फॉलोऑन दिलेला नाही. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. क्षेत्ररक्षण करताना शुभमन गिल जखमी झाल्याने मयंक अग्रवाल सोबत चेतेश्वर पुजारा सलामीला आला. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने आपल्या दुसऱ्या डावात २१ षटकात बिनबाद ६९ धावा केल्या. भारताकडे आता एकूण ३३२ धावांची आघाडी झाली आहे.
किवी संघाच्या एकाही खेळाडूला विकेटवर उभे राहण्याचे धाडस दाखवता आले नाही. अश्विन ४, सिराज ३, अक्षर पटेल २, जयंत यादव १ ने विकेट घेतली. आर अश्विन पहिल्या डावात ४ विकेट्सच्या जोरावर ४२३ कसोटी बळींची नोंद केली. क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो आता १२ व्या क्रमांकावर आला आहे. अश्विनने आज दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज शॉन पोलॉकचा ४२१ विकेट्सचा विक्रम मागे टाकला.
१४ व्या षटकात आर अश्विनने पहिल्याच चेंडूवर हेन्री निकोल्स (७) याला बाद करून किवी संघाची ५ वी विकेट मिळवली. ५ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या जयंत यादवनेही आपल्या पहिल्याच षटकात रचिन रवींद्रची (४) विकेट घेतली. टी-ब्रेकनंतर अश्विनने टॉम ब्लंडल (८) आणि टीम साऊथी (०) यांना बाद करत न्यूझीलंडचे कंबरडे मोडले. विल सोमरव्हिलची (०) विकेटही अश्विनने घेतली. किवी संघाचा ऑलआऊट करण्याचे काम अक्षर पटेलने केले. त्याने काईल जेमिसनला (१७) बाद करून त्यांच्या डावाचा शेवट केला.
न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात सर्वबाद ६२ धावांवर आटोपला. भारताविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमधली ही किवी संघाची सर्वात कमी धावसंख्या होती. यापूर्वी २००२ मध्ये न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध ९४ धावांत ऑलआऊट झाला होता. इतकेच नाही तर भारतीय भूमीवरील कसोटीतील ही सर्वात कमी धावसंख्या आहे. १९८७ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या दिल्ली कसोटीत टीम इंडिया ७५ धावांत ऑलआऊट झाली होती.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने विल यंगला (४) कॅप्टन कोहलीने झेलबाद केले. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर सिराजने टॉम लॅथमची (१०) विकेट घेतली. सिराज इथेच थांबला नाही आणि त्याच्या पुढच्याच षटकात रॉस टेलरला (१) क्लीन बोल्ड केले. या तीन विकेट या युवा वेगवान गोलंदाजाने अवघ्या १३ चेंडूत घेतल्या. डॅरिल मिशेलला (८) एलबीडब्ल्यू बाद करून न्यूझीलंडची चौथी विकेट अक्षर पटेलने घेतली.
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोहम्मद सिराजने विल यंगला (४) कॅप्टन कोहली करवी झेलबाद केले. त्यानंतर चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टॉम लॅथम (१०)ला सिराजने माघारी धाडले. श्रेयसने त्याचा झेल पकडला. पुन्हा एकदा सिराजने आक्रमक गोलंदाजीचे प्रदर्शन करत न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलरची विकेट घेतली. ५.१ व्या षटकात त्याने टेलरचा (१) त्रिफळा उडवला. यानंतर आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलने डॅरिल मिशेलला (८) पायचित करून तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी पाहुण्या न्यूझीलंड संघाची धावसंख्या ४ बाद २७ होती. १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आर अश्विनने न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. त्याने हेन्री निकोल्सला क्लिन बोल्ड केले. हेन्रीला ३१ चेंडूत ७ धावा करता आल्या. यावेळी किवी संघची धावसंख्या ५ बाद ३१ होती. रचिन रविंद्रच्या रुपात न्यूझीलंडला सहावा झटका बसला. त्याला जयंत यादवने बाद केले. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ६ बाद ३८ होती. यानंतर टी ब्रेक झाला. त्यानंतर आर अश्विनने २० व्या षटकात न्यूझीलंडला दोन पाठोपाठ धक्के दिले. २० व्या षटकाच्या ४ थ्या चेंडूवर टॉम ब्लंडेड आणि त्यानंतर सहाव्या चेंडूवर टीम साउदी अश्विनचे बळी ठरले. यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या ८ बाद ५३ होती. विल्यम सोमरविलेच्या (०) रुपात पाहुण्या संघाला ९ वा झटका बसला. आर अश्विनने २७.५ व्या षटकात वैयक्तीक चौथी विकेट घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवल. त्यानंतर अश्विनने पुढच्याच षटकात (२८.१) जेमिसनचा अडसर दूर करत न्यूझीलंडचा पहिला डाव अवघ्या ६२ धावांत गुंडाळला.
तत्पूर्वी, आज सकाळी साडेनऊ वाजता भारतीय संघाने कालच्या ४ बाद २२१ धावसंख्येपुढे खेळण्यास सुरुवात केली. दुस-याच षटकात एजाजने भारताला सलग दोन झटने दिले. किवी संघाचा फिरकीपटू एजाजने ७२ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर अनुक्रमे रिद्धीमान साहा आणि आर अश्विनला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या अक्षर पटेलने एजाजची हॅट्ट्रीक हुकवली. मयंक आणि साहा यांनी ५व्या विकेटसाठी १४४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली.
लंच ब्रेकनंतर पुन्हा एकदा एजाजच्या फिरकीची जादू पहायला मिळाली. त्याने ९९.५ व्या षटकात शतकवीर मयंक अग्रवालला आपल्या जाळ्यात अडकवले. टॉम ब्लंडेडने मयंकचा झेल पकडला. मयंकने ३११ चेंडूत १७ चौकार ४ षटकारांच्या जोरावर १५० धावा केल्या. त्यानंतर १०८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एजाजने अर्धशतकवीर अक्षर पटेलला पायचित केले. ही त्याची आठवी विकेट आहे. अक्षरने १२८ चेंडूत एक षटकार आणि पाच चौकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्यानंतर १०९.२ व्या षटकात जयंत यादवची विकेट घेवून तो विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर पोहचला. अखेर १०९. ५ व्या षटकात ती वेळ आणि सर्व क्रिकेट जग स्तब्ध झाले. कारण एजाजने मोहम्मद सिराजला बाद करत एकाच डावातील १० वा बळी मिळवला. १९९९ नंतर त्याने जागतिक क्रिकेटमध्ये इतिहास रचला.
कसोटी क्रिकेटमध्ये एजाज पटेलने एका डावात १० विकेट्स घेवून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात १० बळी घेणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरला आहे. पटेलच्या आधी हा करिष्मा भारताच्या अनिल कुंबळे आणि इंग्लंडच्या जिम लेकर यांनी आहे. कुंबळेने १९९९ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याचवेळी इंग्लंडच्या जिम लेकरने एका डावात सर्व १० विकेट घेतल्या. १९५६ मध्ये लेकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या.
मुंबईतच जन्मलेल्या एजाजने मुंबई कसोटीत ४७.५ षटकांत ११९ धावांत १० विकेट्स घेऊन विक्रम केला. यात त्याने १२ षटके निर्धाव टाकली. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एजाजने हा अद्भुत पराक्रम करून आपले नाव इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी नोंदवले आहे.
सलामीवीर मयंक अग्रवालने शानदार खेळी करत १५० धावा केल्या. मयंकचे कसोटी क्रिकेटमधील ही तिसरी दीड शतकी धावसंख्या ठरली. मात्र, त्याला एजाज पटेलने आपल्या फिसकीच्या जाळ्यात अडकवले. यष्टिरक्षक टॉम ब्लंडलने त्याचा झेल पकडला. मयंक आणि अक्षर यांनी ७ व्या विकेटसाठी १६८ चेंडूत ६७ धावांची भागीदारी केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या कसोटी डावातील मयंकची ही तिसरी दीड शतकी खेळी आहे.
९८ व्या षटकानंतर लंच ब्रेक झाला. यावेळी भारताची धावसंख्या ६ बाद २८५ होती. सलामीवीर मयंक अग्रवाल नाबाद १४६ आणि अक्षर पटेल नाबाद ३२ धावांवर खेळत होते. मयंक आणि अक्षर यांच्यात ७ व्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी झाली.
मयंक आणि साहा यांनी ५व्या विकेटसाठी १४४ चेंडूत ६४ धावांची भागीदारी केली. भारतीय भूमीवर ६ विकेट घेणारा एजाज पटेल हा दुसरा परदेशी गोलंदाज ठरला. याआधी इंग्लंडच्या जॉन लीव्हर यांनी १९७६ मध्ये दिल्ली कसोटीत हा पराक्रम केला होता. तसेच, अश्विनची सहावी विकेट घेतल्याने, तो भारतातील कसोटीच्या पहिल्या डावात किवी फिरकीपटूकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला. त्याच्या आधी जीतन पटेलने २०१२ मध्ये हैदराबाद कसोटीच्या पहिल्या डावात ४ विकेट घेतल्या होत्या.
काल सामन्याच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने चार विकेट गमावून २२१ धावा केल्या. खेळ थांबला तेंव्हा सलामीवीर मयंक अग्रवाल नाबाद १२० आणि यष्टीरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा २५ धावांवर खेळत होते. दोघांमध्ये ६१ धावांची भागिदारी झाली होती. पण आज दुस-याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर एजाज पटेलने जबरदस्त लयीत खेळणा-या मयंक आणि साहा यांची जोडी फोडली. त्याने साहाला एलबीडल्यू बाद करून भारताला पाचवा झटका दिला. त्यानंतरच्या पाचव्या चेंडूवर आर आश्विन (०)ला क्लिन बोल्ड करून तंबूचा रस्ता दाखवला. हा भारताला सहावा झटका आहे. पहिल्या दिवशी न्यूझीलंडकडून एजाज पटेलने चार विकेट घेतल्या. आज दिवसाच्या सुरुवातीलच त्याने साहा आणि अश्विन यांना बाद करून वैयक्तीक सहा बळींचा आकडा गाठला आहे.
मयंक अग्रवालने सामन्याच्या पहिल्या दिवशी 13 डावांनंतर शतक झळकावले. तो अजूनही नाबाद असून दुसऱ्या दिवशी दुहेरी शतकही ठोकू शकतो. मयंकने भारतात खेळलेल्या 7 कसोटीत 2 द्विशतके झळकावली आहेत. भारतातील या खेळाडूची कामगिरी ऑस्ट्रेलियन फलंदाज ब्रॅडमन यांच्यासारखीच झाली आहे. मयंकने भारतीय भूमीवर 7 सामन्यात 747 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 93.37 आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 4 शतके झळकली आहेत. त्याचवेळी ब्रॅडमन यांनी ऑस्ट्रेलियासाठी 52 कसोटी सामन्यांमध्ये 6996 धावा केल्या आहेत. या महान क्रिकेटपटूची सरासरी 99.94 आहे.
मयंक अग्रवालचे परदेशी भूमीवर रेकॉर्ड काही फारसे चांगले नाही, पण भारतात या खेळाडूचे आकडे ब्रॅडमन यांच्या जवळपास आहेत. मयंकला खराब फॉर्ममुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले होते. पण त्याने कानपूर कसोटीतून पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीतही त्याची कामगिरी निराशाजनक होती, पण मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवशी मयंकने फॉर्ममध्ये परतत सुरेख शतक झळकावले.