स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांची कामे वेगात सुरू | पुढारी

स्मार्ट सिटीअंतर्गत प्रकल्पांची कामे वेगात सुरू

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची कामे वेगात सुरू आहेत. त्यातील काही प्रकल्प पूर्ण ही झाली आहेत, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.29) दिली.

आयुक्त पाटील म्हणाले की, स्मार्ट सिटीअंतर्गत एकूण 1 हजार 378 कोटी 56 लाख खर्चाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली असून, त्यापैकी 867 कोटी 34 लाख खर्चाची कामे सुरू आहेत. एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) व पॅन सिटीअंतर्गत एकूण 31 विविध प्रकल्प आहेत.

त्यापैकी 10 प्रकल्पांचा डीपीआर तयार आहे. एका प्रकल्पाचे निविदा प्रसिद्ध केली असून, 12 प्रकल्पांचे काम सुरू आहे. तर, 9 प्रकल्पांचे कामे पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत एकूण 53 टक्के काम झाले आहेत.

ईडी, वाझेचा भांडाफोड करणार : नवाब मलिक

सौरऊर्जा प्रकल्प, स्मार्ट किऑक्स, बायसिकल शेअरींग, स्कील डेव्हलपमेंट सेंटर, स्टार्ट अप इन्क्युबेशन सेंटर, मुन्सिपल ई-क्लास रुम, स्कुल हेल्थ मॉनिटरिंग, पब्लिक ई-टॉयलेट, सिटी मोबाईल अ‍ॅप अ‍ॅण्ड सोशल मिडीया हे 9 प्रकल्प पूर्ण करण्यात आले आाहेत, असा दावा आयुक्तांनी केला आहे.

एकूण 1 हजार 3073 लाख खर्चाच्या खालील प्रकल्पांचे काम सुरू आहेत. त्यात पर्यावरण सेन्सर (4 कोटी 81 लाख), स्मार्ट ट्राफिक (31 कोटी 38 लाख) सिटी सर्व्हेलन्स (33 कोटी 64 लाख), स्मार्ट पार्कींग इन्क्लुडींग मल्टीलेव्हल कार पार्क (5 कोटी 39 लाख),

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता

कमांड कंट्रोल सेंटर (255 कोटी 98 लाख), ऑप्टीकल फायबर केबल नेटवर्कींग (276 कोटी 98 लाख), स्मार्ट वॉटर सप्लाय (139 कोटी 31 लाख), पब्लिक वायफाय हॉटस्पॉट (20 कोटी 6 लाख), स्मार्ट सेव्हरेज (22 कोटी 24 लाख),

आयसीटी इनॅबल एसडब्लुएम (6 कोटी 2 लाख), स्ट्रीटस्केप इन्क्लुडींग अंडरग्राऊंड युटीलिटी, टयु पार्क अ‍ॅण्ड स्मार्ट टॉयलेट इन एबीडी (378 कोटी 51 लाख) आणि जीआयएस इनॅबल इआरपी इन्क्लुडींग मुनिसीपल सर्व्हीस लेव्हल बेंच मेकींग,

युनीक स्मार्ट अ‍ॅड्रेसिंग अ‍ॅण्ड ऑनलाइन इस्टॅब्लीशमेंट लायसींग्स (132 कोटी 96 लाख) या कामांचा समावेश आहे. ती कामे वेगात सुरू आहेत. ती मुदतीमध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

उत्तर प्रदेशातून योगी जाणार…

तीन प्रकल्पांची निविदा प्रसिद्ध

स्मार्ट सिटीतील तीन प्रकल्पांची एकूण 67 कोटी 71 लाखांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात पिंपळे गुरवमधील व्हीलेज प्लाझा (48 कोटी), इन्व्हायमेंट एज्युकेशन सेंटर अ‍ॅण्ड वेटलॅण्ड पार्क (19 कोटी 35 लाख) आणि कॅम्युनिटी लेव्हल कंम्पोस्टिंग (36 लाख) या कामांचा समावेश आहे, असे आयुक्त पाटील यांनी सांगितले.

  • 31 पैकी 9 प्रकल्प पूर्ण
  • महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची माहिती

 

Back to top button