प्रभागरचनेचा आराखडा 6 डिसेंबरला निवडणूक आयोगास पाठविणार | पुढारी

प्रभागरचनेचा आराखडा 6 डिसेंबरला निवडणूक आयोगास पाठविणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेस काम करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ

आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभागरचनेचे कामकाज सुरू आहे. प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा मंगळवारी (दि.30) पाठविणार होते. मात्र, 5 दिवसांची मुदतवाढ मिळल्याने 6 डिसेंबरला आराखडा राज्य निवडणूक आयोगास पाठविला जाणार आहे. प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करून तो मंगळवार (दि.30) पर्यंत पाठविण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने तीन नोव्हेंबरला महापालिकेस दिले होते.

ईडी, वाझेचा भांडाफोड करणार : नवाब मलिक

महापालिकेच्या 25 अधिकार्‍याच्या समितीमार्फत जीएसआय (जिऑग्रॉफीक इन्फॉर्मेशन सिस्टिम) प्रणालीद्वारे प्रभागरचना करण्याचे काम सुरू आहे. एकूण 139 जागांसाठी एकूण 46 प्रभाग होणार आहेत. त्यात 1 प्रभाग 4 सदस्यांचा असणार आहे. सन 2011 च्या 17 लाख 27 हजार 692 लोकसंख्येनुसार शहरात एकूण 3 हजार 102 गटानुसार (ब्लॉक) रचना केली जात आहे. एका प्रभागात सरासरी 37 हजार लोकसंख्या असणार आहे.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आफ्रिकेत, पण RTPCR तपासणी मात्र ‘कोगनोळी’त!

नैसर्गिक सीमा कायम ठेऊन व लोकसंख्येचे गट न फोडता रचना केली जात आहे. सन 2011 च्या जनगणनेच्या लोकसंख्येनुसार ही प्रभागरचना सुरू आहे. त्यात 11 नगरसेवक वाढणार आहेत. या सगळ्यामुळे जागेवर जाऊन नैसर्गिक सीमा न तोडता प्रभाग तयार करावे लागत आहेत. यामुळे विलंब होत असून अद्याप प्रभागरचना पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी पुणे महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती.

पाठीवर आसूड ओढल्याशिवाय पोटाला मिळत नाही!

त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने 5 डिसेंबरपर्यंत 5 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर 6 डिसेंबरला प्रभागरचनेचा आराखडा सादर करण्याचे आदेश सोमवारी (दि.29) दिले आहेत. त्यानुसार महापालिकेस कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढील 5 दिवसांत प्रभागरचनेचा आराखडा तयार करावा लागणार आहे.

हिंजवडीत कारभारी बदलतात; मात्र विकासाचे काय?

दरम्यान, पिंपरी शहरात सन 2011 च्या जनगणनेनुसार कामकाज सुरू असल्याने वाढलेली लोकसंख्या व नैसर्गिक सीमा न तोडण्यासाठी स्थळ पाहणी केली जात आहे. त्यामुळे प्रभागरचना तयार करण्यास विलंब लागत आहे. त्याकरिता 15 दिवसांची मुदतवाढ द्यावी, असे पत्र राज्य निवडणूक आयोग आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी (दि.29) पाठविले आहे, असे अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ
यांनी सांगितले.

Back to top button