Murder: तासगावतील महिलेचा गळा आवळून खून, अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा संशय - पुढारी

Murder: तासगावतील महिलेचा गळा आवळून खून, अनैतिक संबंधातून प्रकार घडल्याचा संशय

तासगाव; पुढारी वृत्तसेवा : tasgaon crime : येथील वासुबे हद्दीतील आरफळ कालव्या शेजारी निर्मला तानाजी चव्हाण (वय ३१ रा . गणपती मंदिर पाठीमागे, तासगाव ) या महिलेचा मृतदेह आढळला.हा प्रकार खुनाचा असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे .हा खून अनैतिक संबंधातून घडला असल्याच्या संशयावरून एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या बाबत मिळालेली अधिक माहिती अशी : ही महिला येथील गणपती मंदिराच्या पाठीमागे भाड्याच्या खोलीत राहते.गेल्या सहा वर्षा पासून ती तिच्या पती पासून विभक्त राहते.तीचे माहेर वासुबे असून आष्टा येथील पती पासून ती विभक्त असल्याने तासगावात राहते.सोमवारी दुपारी ती राहत्या घरातून बाहेर गेली होती.मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह वासुबे ते कवठेएकद जाणाऱ्या आरफळ योजनेच्या कालव्या शेजारी नागरिकांना आढळून आला.नागरिकांनी याची तातडीने माहिती पोलिसांना दिली असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

स्थानिक महिला असल्याने पोलिसांना तिची ओळख पटली.पोलिसांनी प्राथमिक तपासणी केली असता तिचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. तिचा अन्यत्र खून करून तिचा मृतदेह या ठिकाणी आणून टाकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. या प्रकरणी तासगाव पोलिसांनी संशयित म्हणून एकाला ताब्यात घेतले आहे.

Back to top button