Alia Bhatt wedding : या कारणामुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न पुन्हा पुढे ढकलले? | पुढारी

Alia Bhatt wedding : या कारणामुळे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न पुन्हा पुढे ढकलले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Alia Bhatt wedding) यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत. या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता अस सांगण्यात येत आहे की, या दोघांनी लग्न पुन्हा पुढं ढकलले आहे. आता या दोघांच लग्न डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt wedding) आणि रणबीर कपूर यांच्याकडे या दिवसात लग्न करण्यासाठी वेळ नसल्याचं सांगितलं जात आहे. दोघांनीही देशाच्या बाहेर लग्न करण्याचा प्लॅन केला आहे. त्यामुळे तयारीसाठी वेळ लागणार आहे. रणबीर-आलिया लग्नाआधी आणि लग्नानंतर मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

मागच्या वर्षी एका मुलाखतीत रणबीर कपूर याने सांगितले होते की, जर कोरोनाचे संकट नसते तर आलिया सोबत २०२० मध्ये लग्न केल असते. लवकरच लग्नाचे तारीख फिक्स करणार असल्याचंही त्याने म्हटलं होतं.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया (Alia Bhatt wedding) आणि रणबीर पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. याशिवाय रणबीर कपूर ‘शमशेरा’, ‘अ‍ॅनिमल’ आणि श्रद्धा कपूरसोबत लव रंजन चित्रपटात काम करत आहे. आलिया लवकरच ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’मध्ये दिसणार आहे. याशिवाय आलिया करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्येही दिसणार आहे.

लग्नाआधीच अलिया भट्टनं दिली गुड न्यूज!

आलिया भट्ट (Alia Bhatt wedding) एका अमेरिकन टॅलेंट एजन्सीच्या संपर्कात आहे. ‘विलियम मॉरिस एंडेव्हर’ (William Morris Endeavour) असे या एजन्सीचे नाव आहे. ही एजन्सी अलियाला हॉलिवू़डमध्ये संधी देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अलियाला एका चांगली पटकथा हवी आहे. चांगली ऑफर मिळताच ती हॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले जात आहे.

आलिया हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर लॉरेंसची मोठी फॅन आहे. जेनिफर प्रमाणेच अलियाला चित्रपट करायचे आहेत. आलियाचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी ६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यावेळी अलियाला तिच्या हॉलिवूड पदार्पणाची घोषणा करण्याची इच्छा आहे. तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या पटकथा आहेत. पण तिला हॉलिवूडमध्ये दमदार एंट्री करायची आहे. त्यासाठी चांगल्या संधीच्या प्रतिक्षेत आहे.

हेही वाचलत का?

 

Back to top button