‘आरआरआर’चा ट्रेलर 3 डिसेंबरला येणार

पुढारी ऑनलाईन
राम चरण तेजा, ज्युनिअर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेला एस. एस. राजामौली दिग्दर्शित बहुचर्चित ‘आरआरआर’ या चित्रपटाचा ट्रेलर 3 डिसेंबर रोजी येत असल्याची माहिती आलियाने तिच्या सोशल मीडियावरून दिली आहे. या चित्रपटाचा एक छोटा टीझर आणि एका गाण्याची झलक आत्तापर्यंत समोर आली आहे.
या बिग बजेट चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच विविध हक्कांंच्या विक्रीतून 900 कोटींची कमाई केली आहे. हा चित्रपट 7 जानेवारी रोजी हिंदीसह तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान या चित्रपटात अजय देवगणसह आलिया भट्टला जास्त स्क्रीन टाईम नसल्याचीही माहिती समोल आली आहे. तथापि, आलियाची भूमिका लहान असली तरी तिला 6 कोटी रुपये मानधन दिल्याचेही कळते.