रणवीर सिंहच्या ’83’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Video)
पुढारी ऑनलाईन डेस्क प्रतीक्षेनंतर'83' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. भारताने पहिला क्रिकेट विश्वकप जिंकल्याचा क्षण अविस्मरणीय आहे. यावर आधारित हा चित्रपट आहे. त्या खऱ्या हिरोंच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ज्यांनी देशाचे स्वप्न साकार केले. देशात पहिले क्रिकेट वर्ल्ड कप घेऊन आले. चाहत्यांना दीर्घकाळ प्रतीक्षेनंतर '83' ट्रेलर रिलीजची वाट पाहत होते. ट्रेलर पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता शिगेला होती. अखेर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला.
कपिल देव यांनी १९८३ मध्ये म्हटले होते, "बालपणापासून माझी आई मला म्हणायची, मुला जिंकून ये. हे लक्षात ठेवून रणवीर सिंहने इन्स्टाग्रामवर नवं पोस्टर शेअर केलं होतं. त्याने माहिती दिली की, उद्या या चित्रपटाचा पहिला ट्रेलर रिलीज होईल.
या चित्रपटात रणवीर सिंह कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. शिवाय ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी यांच्याही भूमिका चित्रपटात आहेत. दीपिका पादुकोणने कपिल देव यांची पत्नी रोमीची भूमिका साकारलीय. रिलायन्स एंटरटेनमेंट आणि पीव्हीआर पिक्चर्सचा हा चित्रपट २४ डिसेंबर २०२१ रोजी हिंदी, तमिल, तेलुगू, कन्नड आणि मल्याळममध्ये ३ डी मध्ये रिलीज होणार आहे.

