मेस्सीने सलग सातव्यांदा पटकावला 'बॅलन डी'ओर पुरस्कार

पुढारी : ऑनलाईन डेस्क
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याला फुटबॉल मैदानावरील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुन्हा एकदा ‘बॅलन डी’ओर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मेस्सीने सलग सात वेळा हा हा पुरस्कार प्राप्त करण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. यावेळी मेस्सीचा पुरस्कार सामना पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवांडोव्स्की यांच्याशी होता. मात्र मेस्सीने या दोन स्टार खेळाडूंना मागे टाकत ‘बॅलन डी’ओर पुरस्कारावर माेहर उमटवली आहे.
लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) यापूर्वी 2009, 2010, 2011, 2012, 2015 आणि 2019 मध्ये हा विशेष पुरस्कार पटकावला होता. मेस्सीनंतर क्रिस्टियानो रोनाल्डोने सर्वाधिक वेळा हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. त्याने 2008, 2013, 2014, 2016 आणि 2017 मध्ये हा विशेष पुरस्कार जिंकला. या दोन खेळाडूंनंतर, मार्को व्हॅन बास्टेन, जोहान क्रुफ आणि मायकेल प्लॅटिनी यांनी प्रत्येकी तीन वेळा हा विशेष पुरस्कार जिंकला.रोनाल्डो नाझारियो, फ्रेंच बेकनबॉअर, अल्फ्रेडो डी स्टेफानो, केविन कीगन, कार्ल हेन्झ यांनी अनुक्रमे प्रत्येकी दोनदा हा विशेष पुरस्कार जिंकला आहे.
हा पुरस्कार दरवर्षी क्लब किंवा राष्ट्रीय संघात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. हा विशेष पुरस्कार सर्वप्रथम 1956 मध्ये देण्यात आला होता.
हेही वाचलं का?
- early morning swearing : ‘पहाटेच्या शपथविधी’वर आजही पश्चात्ताप : देवेंद्र फडणवीस
- सोलापूर : संपूर्ण लसीकरण आवश्यक अन्यथा कडक निर्बंध : आयुक्तांचे आदेश
- मॅट्रिमोनी साइटवरील लज्जास्पद जाहिरात व्हायरल! ब्रा, कंबरेच्या आकाराचा उल्लेख
- सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांत जल्ह्यातील 6 तालुक्यात भूजल पातळी घटली
पाहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog