chandrapur st strike : ९० निलंबित तर १०० रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त | पुढारी

chandrapur st strike : ९० निलंबित तर १०० रोजंदारी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : chandrapur st strike : एस टी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारच्या सेवेत विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी चंद्रपुरात अजुनही आंदोलन सुरू आहे. चंद्रपूर विभागीय आगारातील ४९ एसटी कामगारांना रविवारी (दि.२८) निलंबित करण्यात आले असून आतापर्यंत ९० कर्मचारी निलंबित झाले आहेत. तर रोजंदारीवर सेवा देत असलेल्या १०० कर्मचाऱ्यांच्या सेवा ह्या पूर्वीच समाप्त करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकार व एस टी महामंडळाकडून सातत्याने दडपशाहीचे धोरण स्वीकारण्यात येत असूनही एसटी कामगार आंदोलनावर ठाम आहेत. शासनाच्या सेवेत विलिनीकरण होईपर्यंत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. विविध प्रकारे कर्मचाऱ्यांवर दबाव आणूनही कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.

chandrapur st strike : चंद्रपूर विभागातील एकही कर्मचारी कर्तव्यावर रुजू नाही

न्यायालयाच्या अवमाननेची याचिका दाखल करण्याची भाषा करणार्‍या परिवहन मंत्र्यांनी अखेरीस एस. टी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याची घोषणा केली. तरी आजपर्यंत चंद्रपूर विभागाअंतर्गत एकही कर्मचारी आपल्या कर्तव्यावर रुजू झालेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपली कारवाई सुरूच ठेवली आहे.

परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी वेळ दिला होता. मात्र आजपर्यंत येथील एकही कर्मचारी न परतल्याने ४९ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले. यापूर्वी ४१ कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले होते.

त्यामुळे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ९० वर पोहोचली असून रोजंदारी काम करणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.

Back to top button