अशोक सराफ यांचा ‘पिफ’मध्ये होणार सन्मान | पुढारी

अशोक सराफ यांचा ‘पिफ’मध्ये होणार सन्मान

पुणे : पुढारी वृत्तसेवा

19 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा चित्रपटांतील योगदानासाठी यावर्षीच्या ‘पिफ पिस्टिंग्विश्ड अ‍ॅवॉर्ड’ने सन्मान करण्यात येणार आहे. येत्या 2 ते 9 डिसेंबरदरम्यान महोत्सव होणार असून, महोत्सवाचे उद्घाटन गुरुवारी (दि.2) बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

उद्घाटनाच्या कार्यक्रमात अशोक सराफ यांना सन्मानित करण्यात येईल. उद्घाटनानंतर सायंकाळी साडेसात वाजता ‘द वुमन’ (देश – मंगोलिया) हा चित्रपट ‘ओपनिंग फिल्म’ म्हणून दाखविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

हेही वाचलं का?

Back to top button