sangeeta bijlani : वयाच्या ६१ व्या वर्षीही सलमानची एक्स गर्लफ्रेंड ग्‍लॅमरस | पुढारी

sangeeta bijlani : वयाच्या ६१ व्या वर्षीही सलमानची एक्स गर्लफ्रेंड ग्‍लॅमरस

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूडचा किंग खान आणि अभिनेता सलमान खानचा नुकताच ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. याआधी चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर मुंबईत पार पडला. यावेळी दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. यातील खास आकर्षणाचा केंद्रबिदू ६१ वर्षीय अभिनेत्री संगीता बिजलानी ( sangeeta bijlani ) ठरली.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान, संगीता बिजलानी ( sangeeta bijlani ) , सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी, एकता कपूर, जेनेलिया डिसूजा, अलवीरा-अतुल अग्निहोत्री, आनंद एल. राय., बॉबी देओल, दिशा पाटनी, एवलिन शर्मा, गौतम गुलाटी, गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत अरबाज खान, पत्नीसोबत हिमेश रेशमिया, महेश मांजरेकर, मनीष पॉल, मुकेश छाबडा, निकितन धीर, प्रनूतन बहल, सई मांजरेकर, सुनील शेट्टी आणि साजिद नाडियाडवाला यासारख्या अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. परंतु, यातील खास म्हणजे संगीता बिजलानी हिचा लूक आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला.

यावेळी संगीता बिजलानी हिने काळ्या रंगाचा डिप नेक टॉपसोबत चमकदार मिनी स्कर्ट घातला होता. हा लूकमध्ये संगीता सेटवर पोहोचताच चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. या सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रीया केल्या आहेत. यावेळी संगीताचा हॉट लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

संगीता बिजलानी (वय ६१) ही सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड असून ती काही काळापूर्वी डेट करत असल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, यानंतर तिने एका मुलाखतीत सलमानची एक चांगली मैत्रीण असल्याचे स्पष्ट केलं होते. यानंतर संगीता बिजलानीने क्रिकेटर मोहम्मद अझरुद्दीनशी लग्न केले होते. यानंतर दोघेजण २०१० मध्ये विभक्त झाले.

संगीताच्या करिअरविषयी बोलताना तिने ‘त्रिदेव’, ‘हातीम ताई’, ‘योद्धा’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय संगीता तिच्या हॉट लुक आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

हेही वाचलंत का? 

Back to top button