श्रद्धा कपूर म्हणते- बायांनो, तुमच्यासोबत घरगुती हिंसा होत असेल तर | पुढारी

श्रद्धा कपूर म्हणते- बायांनो, तुमच्यासोबत घरगुती हिंसा होत असेल तर

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘इंटरनॅशनल डे फॉर इलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन’ २५ नोव्हेंबरला साजरा झाला. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले. ‘कू’वर राजकारण्यांसह कलावंतांनीही पोस्ट करत स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात आपल्या भावना मांडल्या.

अभिनेत्री श्रद्धा कपूरने या दिवसानिमित्त एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात ती युएन वुमनची प्रतिनिधी निष्ठा सत्यमसोबत चर्चा करताना दिसते आहे.

या चर्चेत श्रद्धाने घरगुती हिंसेबाबतची तिची निरिक्षणं आणि मतं अतिशय प्रगल्भपणे मांडली आहेत. सोबतच अतिशय मनापासून बोलताना ती हळवी झाल्याचेही यात दिसते.

श्रद्धा म्हणाली, “आजची आधुनिक स्त्रीसुद्धा घरगुती हिंसेचं गांभीर्य नेमकेपणाने समजून घेत नाही. ती रोज अपमान सहन करते. हा विषय निघाला, की आजची स्त्री It’s Ok म्हणत सगळा संवाद का थांबवते?’

श्रद्धाने ही बाब ठामपणे मांडली, की जेव्हा महिला स्वत: होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलू लागतील, तो उघड करत एक पाऊल पुढं येतील, तेव्हाच समाजात एक आशा निर्माण होईल. त्यातूनच समाज बदलाकडे जाईल.

श्रद्धाने सगळ्यांना असेही आवाहन केले आहे, की आपण सगळे ही लढाई पीडितांसाठी सोपी बनवू या. आपण त्यांना अत्याचाराबाबत बोलण्यासाठी, त्याविरुद्ध उभे राहण्यासाठी बळ आणि आधार देऊ या. या १४ मिनिटांच्या व्हिडिओत श्रद्धाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.

Back to top button