Nagpur fire : नागपूरच्या कामठी औद्योगिक परिसरातील प्लास्टिक कंपनीला आग | पुढारी

Nagpur fire : नागपूरच्या कामठी औद्योगिक परिसरातील प्लास्टिक कंपनीला आग

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

नागपूर येथील कामठी रोड परिसरातील उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील किसान गोल्ड इंडस्ट्रीज या प्लास्टिक पाईप तयार करणाऱ्या कंपनीला, सोमवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आग लागली. (Nagpur fire) ही कंपनी जुनैद अहमद यांच्या मालकीची आहे. ही आग इतकी भीषण होती की, या आगीने शेजारी असलेल्या बाबा ताज टायर रिमोल्डींग या कंपनीलाही कवेत घेतले. या दोन्ही ठिकाणी प्लास्टिक व टायरचे भंगार, कच्चा माल जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच नागपूर अग्निशमनदलाचे आठ व कामठीचा १ असे ९ बंब आग (Nagpur fire) विझवण्यासाठी दाखल झाले. सध्या आग नियंत्रणात असली तरी पूर्णपणे विझलेली नाही. आग पूर्णपणे आटोक्यात येण्यासाठी आणखी दोन तास लागतील अशी माहिती मुख्य अग्निशमनदल अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली. या वेळेत तिथे कोणीही कामावर नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली आहे. प्लास्टिकच्या सामानामुळे आग धुमसत आहे.

हेही वाचा

Back to top button