उत्कर्ष-मीरा यांच्या मते 'हे' सदस्य घराबाहेर जाण्यास पात्र | पुढारी

उत्कर्ष-मीरा यांच्या मते 'हे' सदस्य घराबाहेर जाण्यास पात्र

मुंबई; पुढारी ऑनलाईन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दर शुक्रवारी घरातील काही सदस्यांमध्ये ही चर्चा नक्कीच रंगते की या आठवड्यात कोणता सदस्य घरी जाण्याची शक्यता आहे वा गेला पाहिजे. या सदस्याने वेळ देऊन देखील हवातसा गेम नाही दाखवला वैगरेवैगरे… आजदेखील घरात उत्कर्ष-मीरा यांच्यामध्ये हीच चर्चा रंगली आहे. तसेच गायत्रीला आता टास्क खेळण्यास मनाई आहे. उत्कर्ष-मीरा यांच्या मते ‘हे’ पुढील सदस्य घराबाहेर जाण्यास पात्र आहेत. हे आज ते सांगताना दिसणार आहेत.

तो गायत्रीला म्हणाला, हेच बिग बॉस लास्ट टाईम देखील बोले होते, खेळताना तुम्ही तुमची आणि समोरच्याची काळजी घ्या.
मीराचे म्हणणे आहे, मला असं खूप वाटतं आहे की, स्नेहा किंवा सोनाली जाणार… तो त्यावर म्हणाला, हो जायला तर पाहिजे. म्हणून तर त्यांना दिलं होतं तुम्ही एक आठवडा नॉमिनेट व्हाल पुढच्या आठवड्यात.

तरी त्यांनी गेम काहीच दाखवला नाहिये. त्यावर मीरा म्हणाली, सोनाली तरी राहू शकते. तो म्हणाला, मला असं वाटतं सोनाली या आठवड्यात होईल आणि पुढच्या आठवड्यात स्नेहा आऊट होणार. मीराचं म्हणणं आहे या आठवड्यात स्नेहा जाणार. सोनाली नाही जाणार. बघूया अजून काय चर्चा केली या दोघांनी आजच्या भागामध्ये.

तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

Back to top button