Ravindra Berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन | पुढारी

Ravindra Berde : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवींद्र यांनी आपल्या भूमिकांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ते काही काळापासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. (Ravindra Berde)

Ravindra Berde : लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र बेर्डे यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. घरी आल्यानंतर त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. आज (दि.१३) पहाटे त्यांचे निधन झाले वयाच्या विसाव्या वर्षी १९६५ मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाने त्यांनी लोकांची मने जिंकली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता असण्यासोबतच रवींद्र बेर्डे यांची आणखी एक ओळख म्हणजे ते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू होते. दोघांनीही अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे.

Ravindra Berde : या कलाकारांची उत्तम जोडी

रवींद्र यांची अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांच्यासोबतची जोडी पडद्यावर खूप गाजली आहे. अनेक प्रकारच्या पात्रांनी त्यांनी लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले होते. रवींद्र यांनी मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही  अभिनय केला आहे. सिंघम, चिंगी यांसारख्या हिंदी चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

हेही वाचा 

Back to top button