The Archies : सुहाना खानचा 'द आर्चीज' रिलीज होताच ऑनलाईन लीक | पुढारी

The Archies : सुहाना खानचा 'द आर्चीज' रिलीज होताच ऑनलाईन लीक

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीर्घ प्रतीक्षेनंतर द आर्चीज आज नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. चित्रपटातील कलाकार सर्व स्टारकिड्स आहेत. (The Archies ) यामध्ये शाहरुख खानची कन्या सुहाना खान, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, अभिनेत्री श्रीदेवी यांची कन्या खुशी कपूर या चित्रपटातून डेब्यू करत आहेत. द आर्चीज रिलीज होताच चित्रपटाला मोठा फटका बसला आहे. कारण हा चित्रपट एचडीमध्ये ऑनलाईन लीक झाला आहे. (The Archies)

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, पायरेसी साईट्सवर हा चित्रपट फ्रीमध्ये उपल्बध झाला आहे. हा चित्रपट एक म्युझिकल कॉमेडी असून १९६० वर आधारित आहे. सुहाना खान, वेरोनिका, खुशी कपूर, अगस्त्य नंदा वेदांग रैना, मिहिर आहूजा, अदिति डॉट यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

दरम्यान, द आर्चीजचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. यावेळी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी शाहरुख खान आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत उपस्थित राहिला. अमिताभ बच्चन यांनीही अगस्त्य आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत फोटो शेला आहे. फोटोला कॅप्सन लिहिलीय-अगस्त्य खूप अधिक प्रेमासोबत. तू चमकावे. तू RIZZ आहेस.

करण जोहरने इन्स्टाग्रामवर द आर्चीज चित्रपटाचे पोस्टर शेअर करत सर्व कलाकारांचे कौतुक केले आहे. त्याने लिहिले आहे- आर्चीज मी पाहिला. अँग्लो इंडियन्सचे एक शहर ज्याला रिवरडेल म्हटलं जातं! सन १९६४ आहे.. आणि क्रेडिट भूमिकेतून तुम्ही थेट जोया अख्तरच्या जगात जाता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

Back to top button