Sonu Sood : "आम्ही तुमच्या वडिलांना मरू देणार नाही," सोनू सूदने 'त्याला' केली मदत | पुढारी

Sonu Sood : "आम्ही तुमच्या वडिलांना मरू देणार नाही," सोनू सूदने 'त्याला' केली मदत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता आणि समाजसेवी सोनू सूद त्याच्या मानवतावादी कार्यामुळे कायम चर्चेत असतो. त्याने अलीकडेच उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील पल्लव सिंग नावाच्या व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या शस्त्रक्रियेचे आश्वासन दिले. (sonu sood) पल्लवच्या परिस्थती बद्दल कळल्यावर सोनू सूदने तातडीने पाऊल उचलले आणि त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लगेच पोस्ट शेअर करून महत्त्वपूर्ण शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आर्थिक मदतीची व्यवस्था केली आहे. (sonu sood)

संबंधित बातम्या –

“भाऊ आम्ही तुझ्या वडिलांना मरू देणार नाही. मला तुमचा नंबर थेट माझ्या वैयक्तिक ट्विटर आयडी इनबॉक्सवर मेसेज करा.. कृपया ट्विटवर शेअर करू नका.”

सोनू सूदच्या परोपकारी प्रयत्नांनी अनेकांना मदत केली आहे. आपल्या अनेक समाजवादी कामातून तो कायम चर्चेत असतो आणि लोकांना मदत करतो. वर्क फ्रंटवर सध्या सोनू झी स्टुडिओज आणि ‍त्याची निर्मिती शक्ती सागर प्रॉडक्शन यांच्या सहकार्याने ‘फतेह’ ही त्याची पहिली निर्मिती पूर्ण केली आहे. २०२४ मध्ये प्रदर्शित होणार्‍या “फतेह” मध्ये उत्कृष्ट अभिनय, मंत्रमुग्ध करणारी केमिस्ट्री, थरारक हॉलीवूड शैलीतील स्टंट बघायला मिळणार आहे आणि जॅकलीन फर्नांडिस यात सह-अभिनेत्री म्हणून दिसणार आहे.

Back to top button