Hight Court : समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर 'मुस्लीमच'  | पुढारी

Hight Court : समीर वानखेडेंच्या शाळेच्या दाखल्यावर 'मुस्लीमच' 

मुंबई, पुढारी ऑनलाईन

राज्य सरकारचे कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपांची सिद्धता होण्यासाठी आणि वानखेडेंच्या वडिलांनी दाखल केलेल्या मानहानी याचिकेविरोधात आणखी काही कागदपत्रे विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये (Hight Court) सादर केली.

या कागदपत्रांमध्ये समीर वानखेडे यांचा शाळेचे प्रवेश पत्र आणि प्राथमिक शाळेचा सोडल्याचा दाखल सादर केला. त्यावर समीर वानखेडे हे ‘मुस्लीम’ असल्याचे दर्शविले आहे. नवाब मलिकांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांमध्ये असं म्हंटलं आहे की, “समीर वानखेडे हे जन्माने मुस्लीम असून त्यांनी केंद्र सरकारची नोकरी मिळविताना अनुसुचित जातीचे (शेड्युल कास्ट) असल्याचे दाखवले आहे.”

न्यायमूर्ती (Hight Court) माधव जामदार यांच्यासमोर हा खटला सुरू आहे. त्यात नवाब मलिकांनी कागदपत्रे सादर केली. आज गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता यावर सुणावणी होणार आहे. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी शुक्रवारपर्यंत ही सुनावणी राखून ठेवलेली होती. यामध्ये समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी सव्वा कोटींचा मानहानीचा दावा दाखल केलेला होता.

“नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावरील आरोपासंदर्भातील सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी होणे आवश्यक आहे”, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. “पण, नवाब मलिक तुमच्याकडून झालेली कागदपत्रांची तपासणी व्यवस्थित असली पाहिजे. कारण, तुम्ही आमदार आणि एका राजकीय पक्षाचे सदस्य आहात. तर तुम्ही हे प्रकरण सावधगिरीने हाताळले पाहिजे”,असंही कोर्टाने म्हंटलेलं आहे.

वकील अर्शद शेख यांनी वानखेडे यांच्या संदर्भातील २८ कागदपत्रे सादर केली. त्यामध्ये जात प्रमाणपत्र, पासपोर्ट, समीर वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला… आदी कागदपत्रे सादर केली. त्यात समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव ‘ज्ञानदेव’ आणि जात ‘महार’, असल्याचे दाखवून दिले. वकील शेख म्हणाले होते की, ज्ञानदेव यांचा मूळचा जन्मदाखला नाही.

Back to top button