Rinku Rajguru : रिंकूनं चाहत्यांना दिली खुशखबर; नवे फोटो केले शेअर | पुढारी

Rinku Rajguru : रिंकूनं चाहत्यांना दिली खुशखबर; नवे फोटो केले शेअर

पुढारी ऑनलाईन डेस्क

‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु (Rinku Rajguru) हिने तिच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे. रिंकूने तिचे काही नवीन फोटो इंस्टाग्रामवरती शेअर केले आहेत. त्यात ती पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. हो फोटो तिच्या नव्या सिनेमाच्या मुहूर्ताचे आहेत. रिंकूचं

रिंकू मणिरत्नम यांचे सहाय्यक दिग्दर्शक राम महिंद्र यांच्या आगामी बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो तिने शेअर केले आहेत. तिने म्हटले आहे, ”राम महिंद्र यांच्या बॉलिवूड पदार्पणाच्या पूजा समारंभातील काही फोटो शेअर करताना अत्यंत आनंद होत आहे. ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या हृदयात स्थान मिळवेल.” असे रिंकूने फोटो शेअर करत म्हटले आहे.

रिंकूची (Rinku Rajguru) भूमिका असलेल्या २०१६ मधील सैराट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर तिने २०१९ मध्ये कागर आणि २०२० मध्ये मेकअप चित्रपट केला. याशिवाय रिंकू राजगुरुचा आगामी ‘२०० हल्ला हो’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलरमध्ये रिंकूने दोनशे महिलांना एकत्र आणले आहे. ती त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असल्याचे दाखवण्यात आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button