Akshay Nemishte : हद्दपार असणारा अक्षय नेमिष्टे पोलीसांच्या ताब्यात | पुढारी

Akshay Nemishte : हद्दपार असणारा अक्षय नेमिष्टे पोलीसांच्या ताब्यात

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा :

हद्दपार असतानाही शहरात फिरणाऱ्या नेमिष्टे टोळीचा म्होरक्या अक्षय नेमिष्टे (Akshay Nemishte) याला इचलकरंजी पोलीसांनी अटक केली आहे. शहरातील उत्तम प्रकाश थिएटर जवळील समता वाइन शॉप जवळ ही कारवाई करण्यात आली.

इचलकरंजी पोलीस दलाच्यावतीने तडीपार आरोपींबाबत शोध मोहीम सुरू असताना नेमिष्टे हा शहरात फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस विभागाने काही दिवसांपूर्वीच नेमिष्टे टोळीला इचलकरंजी शहरातून 3 महिन्यांसाठी तडीपार केले होते.

पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, त्याला गावभाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईत पो.ना.सुनील पाटील, पो.ना.सागर हारगुले, पो. कॉ. सद्दाम शेख यांनी सहभाग घेतला होता.

हे ही वाचा :

Back to top button