Samantha : या चित्रपटात आतापर्यंतची सर्वात बोल्ड भूमिका साकारणार समंथा | पुढारी

Samantha : या चित्रपटात आतापर्यंतची सर्वात बोल्ड भूमिका साकारणार समंथा

पुढारी ऑनलाईन :

अभिनेत्री समंथा रूथ-प्रभू (Samantha) गेल्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत होती. दरम्यान, नुकतेच तिच्या आगामी तमिळ आणि तेलगू भाषेत बनत असलेल्या चित्रपटाचे पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. काथु वाकुला रेंदु काधल असे या चित्रपटाचे नाव असून या चित्रपटात समंथा खातिजा ही भूमिका साकारणार आहे. ही भूमिका समंथाची (Samantha)आत्तापर्यंतची सर्वाधिक बोल्ड भूमिका असल्याचे कळते.

हा चित्रपट पुढील वर्षी डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. या चित्रपटात तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती देखील आहे. विजयच्या या चित्रपटातील भूमिकेचे नाव आहे रॅम्बो. या पूर्वी या दोघांनी ‘सुपर डिलक्स’ या चित्रपटात काम केले आहे.

Back to top button