Audit Diwas : २१ व्या शतकात संकलित आकडेवारीच माहिती : पंतप्रधान मोदी | पुढारी

Audit Diwas : २१ व्या शतकात संकलित आकडेवारीच माहिती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

जुन्या काळात गोष्टींच्या माध्यमातून माहितीचे हस्तांतरण होत असे. कहाण्यांच्या माध्यमातून इतिहास लिहिला जात असे. परंतु,आज २१ व्या शतकात संकलित आकडेवारी हीच माहिती आहे. येत्या काळात आपला इतिहास देखील या आकडेवारीच्या माध्यमातून पाहिला आणि समजून घेतला जाईल. भविष्यात आकडेवारी इतिहास ठरवेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. दिल्लीतील नियंत्रक आणि लेखापरीक्षक संस्थेच्या (कॅग) मुख्यालयात प्रथम ऑडिट दिवसानिमित्त ( Audit Diwas) आयोजित कार्यक्रमाला त्यांनी संबोधित केले. याप्रसंगी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण देखील केले. या वेळी भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक गिरीश चंद्र मुर्मू यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

Audit Diwas : कॅग भारताच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग

काही दशकांपासून, कॅगची प्रतिमा केवळ फाइल्स चाळणारी एजन्सी अशी राहील. पंरतु, कॅग आता भारताच्या विकासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कॅग अर्थात नियंत्रक आणि लेखापरीक्षक संस्था केवळ देशाच्या हिशोबांची नोंद ठेवत नाही तर उत्पादकता आणि कार्यक्षमता यांचे मूल्यवर्धन देखील करते. लेखापरीक्षण दिवसानिमित्त चर्चा आणि इतर संबंधित कार्यक्रम हा आपल्या सुधारणेचा आणि आयत्या वेळी केलेल्या सुधारित प्रक्रियांचा भाग आहे. कॅग या संस्थेने काळासोबत स्वतःचे महत्त्व वाढविले असून एक वारसा निर्माण केला आहे, असे पंतप्रधान म्‍हणाले.

महात्मा गांधी,सरदार पटेल आणि बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहत पंतप्रधान म्हणाले की, या महान नेत्यांनी आपल्याला मोठी उद्दिष्ट्ये निश्चित करून ती कशी साध्य करायची हे शिकविले. एक काळ असा होता जेव्हा देशात लेखापरीक्षणाकडे लोक दडपण आणि भीतीच्या नजरेने पाहत असायचे. “कॅग विरुध्द सरकार’ ही आपल्या यंत्रणेची सर्वसामान्य धारणा बनली होती. परंतु, आज या मनोभूमिकेत बदल झाला आहे. आज लेखापरीक्षणाला मूल्यवर्धनाचा एक महत्त्वाचा भाग समजले जात आहे , असे पंतप्रधानांनी नमूद केले.

पूर्वीच्या काळात बँकिंग क्षेत्रात पारदर्शकतेच्या अभावामुळे अनेक चुकीच्या गोष्टी केल्या जात होत्या. याचा परिणाम असा झाला की,बँकांच्या अनुत्पादक मालमत्तांमध्ये सतत वाढ होत राहिली. “पूर्वीच्या काळी अनुत्पादक मालमत्तांची माहिती कशी दडवली जात होते हे तुम्ही जाणताच, मात्र आम्ही पूर्वीच्या सरकारांबाबतचे सत्य संपूर्ण प्रामाणिकतेने देशासमोर मांडले आहे.जेव्हा आपण समस्या ओळखू तेव्हाच आपण त्यावरील उपाय शोधू शकू,” असेही पंतप्रधान म्हणाले.

यावेळी पंतप्रधान लेखापरिक्षकांना म्हणाले की,आज आपण अशी व्यवस्था निर्माण करत आहोत ज्यामध्ये ‘सरकार सर्वम’ म्हणजे प्रत्येक गोष्टीत सरकारचा हस्तक्षेप असण्याचे प्रमाण कमी होईल आणि तुमचे काम अधिक सोपे होईल.” हा मार्ग ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ या धोरणाला अनुसरूनच आहे. “सेवांच्या वितरणासाठी संपर्कविरहित प्रक्रिया, स्वयंचलित नूतनीकरण, चेहेराविरहित मूल्यमापन, ऑनलाईन सुविधा अशा सर्व सुधारणांमुळे सरकारच्या अनावश्यक हस्तक्षेपाला पायबंद बसला आहे,” असेही पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

कॅगने फाईल्ससह धडपडणारी,कारभारात लुडबुड करणारी संस्था ही प्रतिमा पुसून टाकली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “आधुनिक पद्धतींचा स्वीकार केल्यामुळे कॅगमध्ये वेगवान बदल घडून आले आहेत. आधुनिक विशेषणात्मक साधने, भू-अवकाशीय माहिती आणि उपग्रह प्रतिमा यांचा वापर कॅग करीत आहे, असे ते म्हणाले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा कॅगने अभ्‍यास करावा : पंतप्रधान

देशात जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम राबवीले जात आहे. काही आठवड्यांपूर्वी कोरोना प्रतिबंधक लसीच्या १०० कोटी डोस देण्याचा महत्त्वाचा टप्पा पार करण्यात आला.या मोठ्या लढयादरम्यान उदयाला आलेल्या पद्धतींचा कॅगने अभ्यास करावा, अशी सूचनाही. पंतप्रधानांनी यावेळी केली.

हेही वाचलं का?

 

Back to top button