Rachita Ram : फर्स्ट नाईट वक्तव्यामुळे कन्नड अभिनेत्री चर्चेत | पुढारी

Rachita Ram : फर्स्ट नाईट वक्तव्यामुळे कन्नड अभिनेत्री चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क

कन्नड अभिनेत्री रचिता राम (Rachita Ram) हिने लग्नाच्या पहिल्या रात्री बाबत (फर्स्ट नाईट) केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. रचिताने तिच्या ‘लव्ह यू रच्चू’ (Love you Racchu) चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत ‘फस्ट नाईट’ विषयाशी संबंधित एक वक्तव्य केले. तिच्या या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत कन्नड क्रांती दलने रचिताने माफी मागावी आणि तिच्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

डिंपल क्वीन नावाने प्रसिद्ध असलेल्या रचिताला पत्रकार परिषदेत इंटिमेट सीन्स विषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर रचिताने उलट प्रश्न केला की, तुम्ही तुमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री काय केले होते? तिच्या या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यावेळी रचिताने तिच्या आगामी चित्रपटातील बोल्ड सीन्स विषयी खुलासा केला. चित्रपटात बोल्ड सीन्स असावेत अशी मागणी होती, असे ती म्हणाली.

रचिताने (Rachita Ram) पत्रकारांना उद्देशून म्हटले की, ‘इथे बहुतांश जण विवाहित आहेत. तुम्हाला लज्जास्पद वाटावे असे काही बोलण्याचा माझा उद्देश नव्हता. पण असेच विचारत आहे की लग्नानंतर लोक काय करतात?’. या तिच्या प्रश्नावर कोणी काही बोलण्याआधीच तिने स्वतः उत्तर दिले. तिने म्हटले की, ‘रोमान्सच करणार ना…हेच चित्रपटात दाखविण्यात आलंय.’

अश्लिल वक्तव्य केल्याप्रकरणी रचिताने जाहीर माफी मागावी, अशी मागणी कन्नड क्रांती दलने केली आहे. कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने रचिताचे वक्तव्य आपल्या संस्कृतीच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. रचिताने केलेले वक्तव्य भारतीय सभ्यतेच्या विरोधात आहे. यामुळे राज्याच्या प्रतिमेला नुकसान पोहोचल्याचा दावा त्यांनी केला आहे.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Rachita Ram (@rachita_instaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rachita Ram (@rachita_instaofficial)

 

View this post on Instagram

 

A post shared by Rachita Ram (@rachita_instaofficial)

Back to top button