Rajkumar Rao : ११ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बांधली पत्रलेखाशी लग्नाची गाठ - पुढारी

Rajkumar Rao : ११ वर्षांच्या रिलेशनशीपनंतर बांधली पत्रलेखाशी लग्नाची गाठ

पुढारी ऑनलाईन :

बॉलिवूड स्टार राजकुमार राव (Rajkummar Rao) ने चंदीगढमध्ये पत्रलेखाशी लग्नगाठ बांधली. राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि पत्रलेखा (Patralekhaa) हे ११ वर्षे रिलेशनशीपमध्ये होते.

यावेळी दोघांच्या घरचे सदस्य आणि पाहुणे, मित्रमंडळी उपस्थित होते. राजकुमार आणि पत्रलेखाने आपापल्या इन्स्टाग्रामवर वेडिंग फोटोज शेअर केले आहेत. हे क्यूट कपल वधू-वर वेषात खूपचं सुंदर दिसत आहे.

‘लॉंग बिल्ड डाऊविचर’ : गोव्यात प्रथमच पक्षाची नोंद; दोन चिमुरड्यांनी केले छायांकित

पत्रलेखा

 

दोघांचे ११ वर्षे अफेअर होतं. २०१० पासून ते रिलेशनशीपमध्ये होते. अखेर १५ नोव्हेंबर, २०२१ रोजी त्यांनी लग्न केले.

वेडिंग फोटोज शेअर करताना राजकुमारने आपल्या इन्स्टावर पोस्ट लिहिलियं-अखेर ११ वर्षे प्रेम, मैत्री, रोमान्स आणि मस्तीनंतर.

मी माझं सर्वकाही असलेली पत्रलेखासोबत लग्न केलं. माझी सोलमेट, माझी सर्वात चांगली मैत्रीण, माझं कुटूंब. आज माझ्यासाठी तुझा पती म्हणणे हाचं सर्वात मोठा आनंद आहे.

पत्रलेखाने देखील दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. पत्रलेखानेदेखील हेच लिहिलंय.

लग्नाच्या दोन दिवस आधी त्यांना साखरपुडा केला होता. त्यांच्या साखरपुड्याचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामध्ये राजकुमार गुडघ्यावर बसून पत्रलेखाला अंगठी घालताना दिसत होता.

एकमेकांना अंगठी घातल्यानंतर दोघांनी ऐड शीरनच्या गाण्यावर रोमँटिक डान्सदेखील केला. साखरपुड्याच्यात पत्रलेखाने व्हाईट आणि सिल्वर गाउन घातला होता. राजकुमार रावदेखील मॅचिंग आउटफिटमध्ये दिसला होता.

राव आणि पत्रलेखाने न्यू चंदिगढच्या एका रिसॉर्टमध्ये पार्टी दिली होती. या पार्टीत फराह खान आणि अभिनेता साकिब सलीमशिवाय त्यांचे काही जवळचे मित्रांची उपस्थिती होती. दोघे चित्रपट निर्माता हंसल मेहताचा २०१४ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘सिटीलाईट्स’ आणि अल्ट बालाजीच्या ‘बोस डेडअलाईव्ह’मध्ये एकत्र दिसले होते.

 

Back to top button