bbm - 3 : घरावर एलियनचा कब्जा, पुढे काय होणार? | पुढारी

bbm - 3 : घरावर एलियनचा कब्जा, पुढे काय होणार?

पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामधून काल नीथा शेट्टी – साळवी घराबाहेर पडली. बिग बॉस मराठी सिझनला या पर्वाचे TOP १० सदस्य मिळाले. आता इथून पुढे टास्क, आणि सदस्यांचा घरामधील प्रवास अधिक कठीण होणार यात शंका नाही. दरम्यान, बिग बॉस मराठी सिझन तिसराच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसून येत आहे काहीतरी वेगळेच घडते आहे. त्याला कारणसुध्दा तसेच आहे. बिग बॉसच्या घरावर एलियनचा कब्जा (bbm – 3) झालाय. घरातील सर्व सदस्यांनी लिव्हिंग एरियात एकत्र जमावे असा आदेश बिग बॉस यांनी दिलाय. (bbm – 3)

आता हे टॉप १० सदस्य कसा खेळ खेळतील ? या आठवड्यात कोण कोणते सदस्य नॉमिनेशनमध्ये जातील ? कोण घराचा कॅप्टन बनेल ? साप्ताहिक कार्य काय असेल ? हे हळूहळू समजेलच. हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

 

Back to top button