Nathy Kihara : ‘या’ मॉडलने १३ कोटी देऊन शरीराच्या ‘या’ भागाचा उतरवला विमा

Nathy Kihara : ‘या’ मॉडलने १३ कोटी देऊन शरीराच्या ‘या’ भागाचा उतरवला विमा
Published on
Updated on

ब्राझीलची मॉडल नाथी किहारा (Nathy Kihara) ला मिस बमबम वर्ल्ड निवडण्यात आलंय. तिने आपल्या शरीराचा एक भाग १.३ मिलियन पाउंड (जवळपास १३ कोटी रुपये) देऊन विमा उतरवला आहे.(Nathy Kihara)

लोक आपल्या घराचा, कारचा विमा उतरवतात. पण, ब्राझीलच्या एका मॉडलने १३ कोटी देऊन आपल्या बट (Butt) चा विमा उतरवला आहे. ब्राझीलियन मॉडल नाथी किहाराला सर्वात कमी वयाची मिस बमबम वर्ल्ड निवडण्यात आलंय.

मीडिया रिपोर्टनुसार, ३५ वर्षीय मॉडल नाथी किहाराने मिस बट वर्ल्ड २०२१ चा किताब आपल्या नावे केलाय. सर्व स्पर्धकांमधून सर्वात अधिक लाईक्स (वोट) मिळवल्यानंतर किहाराला मिस बट वर्ल्ड निवडण्यात आलं.

हा किताब जिंकल्यानंतर किहाराने आपल्या बटचा विमा करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने १.३ मिलियन पाउंड (१२ कोटी ९५ लाख) रुपये खर्च केले. म्हणजेचं किहाराने जवळपास १३ कोटी रुपये देऊन आपल्या शरीराचा एका भागाचा विमा उतरवला.

किहारा म्हणते- "मी माझ्या बट (Butt) मुळे चर्चेत आहे. मी बटचा किताब जिंकला आहे. यासाठी विमा उतरवला. ती म्हणते-ती अद्यापही बटच्या आकारावरून समाधानी नाही. व्यायामाच्या माध्यमातून आकार योग्य येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. किहाराचा बट अद्यापही १२६ सेंटीमीटरचा आहे. ते आता १३० समी. करणं लक्ष्य आहे.

नाथी दोन मुलांची आई आहे. एक ९ वर्षाचा मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीला तिने यावर्षाच्या सुरूवातीला जन्म दिला आहे.
नाथी म्हणते, माझं बट पूर्णपणे प्राकृतिक आहे. मी शरीर मेंटेन ठेवण्यासाठी प्रशिक्षण घेते. आई झाल्यानंतर जिममध्ये केवळ वजन उठवण्याऐवजी आहारावर अधिक लक्ष देणं सुरू केलं.

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. किताब जिंकल्यानंतर एक फोटो तिने इन्स्टावर अपलोड केला आहे. या फोटोवर हजारो यजर्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news