चंद्रपूर : मॉर्निंग वॉकवेळी तीन तरूणांना अज्ञात वाहनाने चिरडले; १ ठार, २ गंभीर | पुढारी

चंद्रपूर : मॉर्निंग वॉकवेळी तीन तरूणांना अज्ञात वाहनाने चिरडले; १ ठार, २ गंभीर

चंद्रपूर ; पुढारी वृत्‍तसेवा

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तीन तरूणांना अज्ञात वाहनाने जबर धडक देत चिरडले. ही घटना आज (सोमवार) सकाळी चूनारकर पेट्रोल पंपाजवळ घडली. या घटनेमध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन तरूण गंभीर जखमी झाले आहेत. दीपक दादोरिया असे मृताचे नाव आहे. तो व्याहाड (बुज) येथील रहिवासी होता.

चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावरील ग्रामीण भागातील बरेच तरूण मॉर्निंग वॉकला जात असतात. आज व्याहाड (बूज) येथील 3 तरूण एकत्र मिळून मॉर्निंग वॉकला गेले होते. दरम्यान त्याच मार्गाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्या तरूणांना जबर धडक देत चिरडले. ही घटना चूनारकर पेट्रोल पंपाजवळ घडली.

या अपघातात दिपक दादोरीया या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अंकुश सोयाम, अक्षय रामटेके हे दोघेजण गंभीर जखमी झाले. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Back to top button