Bigg Boss 17 : हिरो बनायला चालला होता 'हा' स्पर्धक, बिग बॉसने दाखवला आरसा | पुढारी

Bigg Boss 17 : हिरो बनायला चालला होता 'हा' स्पर्धक, बिग बॉसने दाखवला आरसा

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिॲलिटी शो बिग बॉसच्या १७ सीझनमध्ये काही ना काही तरी वाद झालेला दिसत आहे. (Bigg Boss 17) आता एका इंटरनेट स्टारवरून बिग बॉसच्या घरात नवा वाद पाहायला मिळायला. सोशल मीडिया स्टार अनुराग डोबालची पर्सनॅलिटी पाहून तो शोमध्ये काही तरी चांगले करेल, असे बिग बॉसला वाटत होते. (Bigg Boss 17)

संबंधित बातम्या –

मागील दिड आठवड्यात बिग बॉसच्या घरात अनुराग फक्त सगळ्यांची खिल्ली उडवत होता. यानंतर बिग बॉसने नॅशनल टीव्हीवर त्याची चांगली च खोड मोडत आरसा दाखवला. बिग बॉसने ओरडल्यानंतर सुपर कॉन्फिडेंट अनुरागला अश्रू अनावर झाले आणि तो रडू लागला.
तो संपूर्ण दिवस घरातील लोकांमध्ये (खासकरून युट्यूबर्स) बिग बॉस विरोधात सांगत राहिला. त्याला वाटत होतं की, निर्माते यु-ट्यूबर्सना टीव्ही स्टार्सपेक्षा कमी लेखत आहे. म्हणून इंटरनेट स्टार्सना कमी स्क्रीन स्पेस दिले जात आहे.

संबंधित बातम्या

अनुरागच्या या तक्रारीनंतर बिग बॉसने तत्काळ कारवाई करत अनुरागला सांगितलं की त्याचा गेम वीक आहे. तो घरात काहीच मजेशीर करत नाही. जर त्याने काही मजेशीर गोष्टी केल्या असत्या तर त्याला ही फोकस केलं अशते. अनुरागला बिग बॉसने सर्व काही शिकवलं तरीही तो आहे त्याच मार्गावर चालत आहे. बिग बॉस हाऊसमध्ये सर्वांना गेम कसे खेळायचे, याविषयी सांगतात.

बिग बॉस त्याला अनुराग बाबा बोलवतात, आपल्याला सर्व गोष्टींचे ज्ञान आहे, अशे अनुरागला वाटते. पण,गेममध्ये घुसणे आणि ॲक्शन न घेतल्याने त्याचा गेम खराब वाटत आहे. घरातल्या स्पर्धकांशी तो छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतो. त्याच्याकडे बोलायला मुद्दे नाही. जर गोंधळाच्या स्थितीतील पर्सनॅलिटी असेल तर त्याचा गेम फेल होणे निश्चित आहे.

बिग बॉसने फटकारल्यानंतर त्याचा विश्वास डगमगला आहे. आता तो विक्की भैय्याच्या शरण आला आहे. जर असेच सुरुच राहिले तर अनुरागची ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न तुटले.

 

Back to top button