इंडियन आयडॉल- 14 : टॉप 15 स्पर्धकांचा होणार भव्य ‘गृह प्रवेश’ | पुढारी

इंडियन आयडॉल- 14 : टॉप 15 स्पर्धकांचा होणार भव्य ‘गृह प्रवेश’

पुढारी ऑनलाईन डेस्क – इंडियन आयडॉलच्या 14 व्या सीझनच्या अलीकडेच झालेल्या थिएटर फेरीत यंदाच्या सर्वोत्तम 15 स्पर्धकांची निवड झाली आहे. या आठवड्यातील ग्रँड प्रीमियर एपिसोड्सचे थीम ‘गृह प्रवेश’ असे आहे. परीक्षक कुमार सानू, श्रेया घोषाल आणि विशाल दादलानी भारतातील सर्वश्रेष्ठ गायक शोधून काढण्यासाठी सज्ज झाले आहेत. होस्ट हुसैन कुवाजेरवाला शो च्या रंजकतेत भर घालेल.

संबंधित बातम्या –

ग्रँड प्रीमियर आणखी भव्य बनवण्यासाठी सलीम-सुलेमान, हंसराज रघुवंशी, रिचा शर्मा, अभिजीत सावंत यांसारखे कलाकार हजेरी लावणार आहेत. अर्शद वारसी सुद्धा श्रीराम चंद्रा आणि शोएब इब्राहीम या दोन स्पर्धकांना घेऊन येणार आहे.

श्रेया घोषाल ‘गृह प्रवेश’ म्हणते, “मी राष्ट्रीय पुरस्कार घरी घेऊन येते तेव्हा मला जसा आनंद होतो, तसाच आनंद मला इंडियन आयडॉल या ‘घराण्यात’ परतताना होत आहे. सर्व टॉप 15 स्पर्धकांचे मी अभिनंदन करते. आम्ही काही अद्भुत स्पर्धक निवडले आहेत आणि मी स्वतः देशभरात आणि देशाच्या बाहेर देखील त्यांचे कौतुक ऐकले आहे. आमच्यासकट सर्व रसिक प्रेक्षक या स्पर्धकांचे गाणे ऐकण्यास आतुर झाले आहेत. हा खूप मोठा दिवस आहे कारण आम्ही टॉप 15 स्पर्धकांचे इंडियन आयडॉल घराण्यात स्वागत करत आहोत.

कुमार सानू आणि विशाल दादलानी यांनी देखील श्रेयाच्या सुरात सूर मिळवून टॉप 15 स्पर्धकांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. इंडियन आयडॉल सीझन 14 मध्ये ‘गृह प्रवेश’ एपिसोड या 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी पाहायला मिळेल.

Back to top button