‘गाथा नवनाथांची’ मालिकेत आरूष बेडेकर बाल नागनाथांच्या भूमिकेत | पुढारी

'गाथा नवनाथांची' मालिकेत आरूष बेडेकर बाल नागनाथांच्या भूमिकेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेमध्ये बालकलाकार आरूष बेडेकर बाल नागनाथांची भूमिका साकारणार आहे. आरूषने याआधीही आपल्या निरागस अभिनयानी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेतच. आता बाल नागनाथांच्या भूमिकेत तो कशा पद्धतीनं आपल्याला भुरळ घालतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या-

एका गावात दुष्काळग्रस्थ परिस्थिती निर्माण झाली आहे. या दुष्काळग्रस्त गावात बालनागनाथ कशाप्रकारे येतात आणि बालनागनाथांच्या अवतरण्याने त्या गावाचा कसा कायापालट होतो, याची चमत्कारिक गोष्ट या विशेष भागात दाखवण्यात येणार आहे.

‘गाथा नवनाथांची’ या मालिकेने अनेक भाग पूर्ण केले आहेत. त्याद्वारे नाथसंप्रदाय आणि त्याची शिकवण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या मालिकेने यशस्वीरीत्या पार पडलं आहे, असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. नाथसंप्रदाय आपल्या शिकवणीद्वारे त्यांच्या भक्तांना मोक्षप्राप्तीचे सरळ-साधे मार्ग दाखवत असतात, जेणेकरून प्रपंच आणि जबाबदाऱ्या यांच्या मागे धावणाऱ्या आपल्या शिष्यांना, आपल्या भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळेल. कधी चमत्कार तर कधी साक्षात्कार देत नाथसंप्रदाय समजला एकवटण्याचं कार्य करीत आलेला आहे.

बाल नागनाथ आणि त्यांचा जीवनप्रवास रेखाटणारे ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेतले पुढचे विशेष भाग हे आरूष बेडेकर या बालकलाकाराच्या अभिनयाने आणखी रंजक झाले आहेत. बाल नागनाथांच्या भूमिकेत आरूषनेही खूप मेहनत घेतली असून हे विशेष भाग ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत पाहायला मिळेल.

Back to top button