Leo Worldwide 500 crore : ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचायला तयार लियो | पुढारी

Leo Worldwide 500 crore : ५०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचायला तयार लियो

पुढारी ऑनलाईन डेस्क : थलापती विजयचा चित्रपट ‘लियो’ बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. या चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशी ४७० कोटींची कमाई केली आहे. (Leo Worldwide 500 crore ) हा चित्रपट आज किंवा उद्या वर्ल्डवाईड ५०० कोटींच्या क्लबमध्ये नक्की पोहोचले. १९ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज झाला होता. (Leo Worldwide 500 crore)

संबंधित बातम्या –

वर्ल्डवाईड कलेक्शन –

Day 1: 34cr

Day 2: 25.5cr

Day 3: 26.5cr

Day 4: 27 cr

Day 5: 25cr

Total collection: 138 crore

यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

विजय थलापतीच्या या चित्रपटाने आतापर्यंत वर्ल्डवाईड जवळपास ५०० कोटींचे कलेक्शन केले आहे. त्यानुसार, २०२३ मधीलआतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.

पहिल्या पाच दिवसात लियोने ४०० कोटींचा आकडा पार केला होता. सहाव्या दिवशी ४७० कोटींची एकूण कमाई झालीय. आथा लवकरच ५०० कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपट समाविष्ट होईल, अशी चाहत्यांनी अपेक्षा व्यक्त केलीय. लियो चित्रपटाचे बजेट २५० ते ३०० कोटी आहे. लियो ए हिस्ट्री ऑफ वायलेंस एक रीमेक आहे.

इतक्या भाषांमध्ये रिलीज चित्रपट

जगभरात हा चित्रपट २० हजारांपेक्षा अधिक स्क्रीनवर रिलीज झाला आहे. तमिळ, तेलुगु, कन्नड आणि हिंदीमध्ये एकत्र हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये त्रिशा, संजय दत्त, अर्जुन सरजा, गौतम मेनन, प्रिया आनंद, मैथ्यू थॉमस, मंसूर अली खान आहेत.

Back to top button