Ranbir Kapoor : रणबीर कपूरने का घेतला चित्रपटांतून ब्रेक, खास कारण आलं समोर | पुढारी

Ranbir Kapoor : रणबीर कपूरने का घेतला चित्रपटांतून ब्रेक, खास कारण आलं समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क – रणबीर कपूर ‘अॅनिमल’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. पण आता तो आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. तो सहा महिने चित्रपटांपासून ब्रेक घेणार असल्याची माहिती समोर आलीय. (Ranbir Kapoor ) ॲनिमल नंतर तो सहा महिने विश्रांती घेईल, अशी माहिती समोर आलीय.  (Ranbir Kapoor)

संबंधित बातम्या –

रिपोर्टनुसार, तो आपली मुलगी राहासाठी ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याला आपल्या मुलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे. त्याला राहासोबत अधिकाधिक वेळ घालवायचा आहे.

रणबीर कपूर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा खूप आनंद घेत आहे. रणबीरने राष्ट्रीय पुरस्कार विजेती आलिया भट्टसोबत लग्न केले असून त्याला राहा ही मुलगी आहे. रणबीरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुलगी राहासोबतच्या त्याच्या बॉन्डबद्दलही बोलले.

चाहत्यांशी साधला संवाद

झूमवर बोलताना रणबीर कपूर म्हणाला- राहाच्या जन्मानंतर तो सातत्याने शूटिंगमध्ये बिझी होता. त्यामुळे त्याला सुरुवातीच्या काही महिन्यात आपल्या मुलीसोबत वेळ घालवता आला नाही. रणबीर चाहत्यांशी बोलताना म्हणाला की, आपल्या मुलीसोबत दर्जेदार वेळ घालवण्यासाठी चित्रपटांमधून सहा महिन्यांचा ब्रेक घेणार आहे.

animal
animal

दरम्यान, रणबीर कपूरचा ॲनिमल चित्रपट चर्चेत असून तो रश्मिका मंदान्नाससोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Back to top button