Jhimma 2 : रिंकू राजगुरू – शिवानी सुर्वे घेऊन येताहेत झिम्मा २ | पुढारी

Jhimma 2 : रिंकू राजगुरू - शिवानी सुर्वे घेऊन येताहेत झिम्मा २

पुढारी ऑनलाईन डेस्क : जिओ स्टुडिओज आणि आनंद एल राय प्रस्तूत, चलचित्र मंडळी निर्मित आगामी मराठी चित्रपट झिम्मा २ चे प्रमोशन सुरु झाले आहे. (Jhimma 2) काही दिवसांपूर्वी, निर्मात्यांनी २४ नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज होत असल्याची घोषणा करताच सोशल  मीडियावर प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली होती. दसऱ्याच्या शुभ दिवशी चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे, विशेष म्हणजे झिम्म्याच्या ताफ्यात रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे दाखल झाले आहेत! (Jhimma 2)

संबंधित बातम्या – 

सुपरहिट चित्रपट झिम्मानंतर आता पुन्हा नव्या पोस्टरमधून आपल्या सगळ्या आवडत्या कलाकारांचा धम्माल लूक पाहायला मिळणार आहेत. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर सर्वांना भेटण्यास आतुर झाले आहेत. सुहास जोशी, क्षिती जोग, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव आणि निर्मिती सावंत यांच्या बरोबरीने आणखी दोन प्रसिद्ध चेहरे तगड्या कलाकारांच्या टोळीत सामील झाले आहेत.

रिंकू राजगुरू आणि शिवानी सुर्वे या दोघींची पात्रे काय आहेत आणि ती या कथेत काय रंग भरणार, यासाठी मात्र प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कलर येल्लो प्रॉडक्शन्सच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि चलचित्र मंडळी निर्मित चित्रपट येत आहे.

बॉक्स ऑफिसवर यशस्वी छाप पाडत झिम्माने प्रेक्षकांच्या मनात घर तयार केले आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी चित्रपटाचा सिक्वेल आणण्यास केले आहे. आज झिम्मा २ साठी प्रेक्षकांची उत्सुकता बघता हेमंत ढोमे म्हणाले की, “पहिल्या भागाला लोकप्रियता मिळाली म्हणून दुसरा भाग करूया, असं कधीच ठरलं नव्हतं. पहिल्या भागाची कथा पुढे नेताना रियूनियनची मजा सापडली आणि हा चित्रपट करायचं ठरलं! लोकांनी कथेवर, त्यातील पात्रांवर भरभरून प्रेम केलं. त्यामुळे या पात्रांना पुन्हा तितक्याच सहजतेने सादर करण्याची जबाबदारी होती. पण माझ्या संपूर्ण टिमने झिम्मा २ मजा घेत आणि आपलेपणाने बनवला आहे, मला खात्री आहे आमचा हा आपलेपणा, साधेपणा प्रेक्षकांनाही आपलंसं करेल.”

ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्मित हा चित्रपट २४ नोव्हेंबर, २०२३ रोजी सिनेमागृहात दाखल होत आहे.

Back to top button