Jailer Villain Vinayakan Arrested : ‘जेलर’चा खलनायक विनायकनला अटक | पुढारी

Jailer Villain Vinayakan Arrested : 'जेलर'चा खलनायक विनायकनला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘थलैवा’ रजनीकांत यांचा चित्रपट जेलरमध्ये भयानक खलनायकाची भूमिका साकारणारे अभिनेते विनायकन  (Jailer Villain Vinayakan Arrested) यांना अटक करण्यात आलीय. रिपोर्टनुसार, केरळ पोलिसांनी मंगळवारी त्यांना नशेत असताना अभिनेताने तथाकथित सायंकाळी एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये काहीतरी समस्या झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलिस ठाण्यात बोलावलं होतं. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, त्यांना पोलिस ठाण्यात गोंधळ घालण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीय. विनायकन यांना आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.”

संबंधित बातम्या- 

महिला इन्स्पेक्टरसोबत घातला वाद

रिपोर्टनुसार, मद्य पिल्यानंतर अभिनेते विनायकन पोलिस ठाण्यात पोहोचले आणि यावेळी त्यांनी पोलसांच्या कामात अडथळा आणला, त्यानंतर विनायकन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. अभिनेते विनायकन यांना त्यांच्या पत्नीसोबत एक खासगी वाद सोडवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं होतं. महिला इन्स्पेक्टरच्या उपस्थितीत दोघांचे म्हणणे ऐकून घेण्यात आळे. यावेळी पक्षपातीपणाचा आरोप करत विनायकनने पोलिस ठाण्यात गोंधळ घातला. यानंतर त्यांनी महिला इन्स्पेक्टरशी वाद घालण्यास सुरुवात केली.

 

Back to top button