Kangana Ranaut : कंगनाने घेतली इस्त्राएलच्या राजदुतांची भेट (Video) | पुढारी

Kangana Ranaut : कंगनाने घेतली इस्त्राएलच्या राजदुतांची भेट (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरात इस्त्राएल-हमास युद्धाची चर्चा सुरु अळताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने (Kangana Ranaut) दिल्लीमध्ये इस्त्राएलच्या राजदूताची भेट घेतली. यावेळी कंगनाने इस्लामिक दहशतवादाचा विरोध करत इस्त्राएलचे समर्थन केले. या बैठकीदरम्यानचे फोटो कंगनाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Kangana Ranaut)

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय- आज संपूर्ण जग, खासकरून इस्त्राएल आणि भारत दहशतवादाच्या विरोधात लढा देत आहेत. काल जेव्हा मी रावण दहन करण्यासाठी दिल्लीत पोहोचले, तेव्हा मला वाटलं की, मला इस्त्राएलच्या राजदुतांना भेटायला हवे, जे आजचे आधुनिक रावण हमाससारख्या दहशतवाद्यांनी पराभूत करत आहेत.

‘ज्या प्रकारे लहान मुले, महिलांना निशाणा बनवलं जात आहे, हे मन हेलावून टाकणारे आहे. मसा पूर्ण आशा आहे की, दहशतवादाविरोधात या युद्धात इस्त्राएल विजयी होईल. त्यांच्यासोबत मी माझा आगामी चित्रपट तेजस आणि भारताचे आत्मनिर्भर लढाऊ विमान तेजसविषयी चर्चा केली.”

काही दिवस आधी कंगनाने इस्त्राएलच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता. तिने हमासच्या लोखांना दहशतवादी म्हटलं होतं. कंगनाने पोस्टमध्ये लिहिलं होतं की-असे अजिबात होऊ शकत नाही की, सोशल मीडियावर दिसत असलेल्या इस्त्राएली महिलांचे फोटो पाहून मन हेलावणार नाही आणि भीती वाटू नये! ….

Back to top button