Shilpa Shetty- Raj Kundra | शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांनी खरंच घटस्फोट घेतला का? राजच्या पोस्टनंतर कमेंट्सचा धुरळा! | पुढारी

Shilpa Shetty- Raj Kundra | शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा यांनी खरंच घटस्फोट घेतला का? राजच्या पोस्टनंतर कमेंट्सचा धुरळा!

पुढारी ऑनलाईन : अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Actress Shilpa Shetty) आणि तिचा उद्योजक पती राज कुंद्रा (Raj Kundra) विभक्त झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. राज कुंद्रा याने त्याच्या X अकाऊंटवर आम्ही दोघे वेगळे होत असल्याचे जाहीर केल्याने खरंच तुम्ही घटस्फोट घेतला का? असा सवाल यूजर्सनी केला आहे. राजच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा धुरळा पडला आहे.

संबंधित बातम्या 

थेट उल्लेख न करता, राज कुंद्राने पोस्टमध्ये म्हटले आहे, “आम्ही विभक्त झालो आहोत आणि या कठीण काळात आम्हाला वेळ द्यावा अशी विनंती करतो.” त्याच्या या पोस्टवर अनेक यूजर्संनी दोघे खरोखरच वेगळे झाला आहात का? वेगळे म्हणजे घटस्फोट का? असे सवाल केले आहेत.

राजने याच पोस्टचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीजवरही शेअर केला आहे. त्याच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये सवाल केला आहे की, “वेगळे म्हणजे? घटस्फोट?” दुसऱ्याने “खरोखर ही धक्कादायक बातमी दुःखद आहे,” असे म्हटले आहे. काहींनी ही केवळ नौटंकी असून हा केवळ प्रसिद्धीचा स्टंट असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. (Shilpa Shetty- Raj Kundra)

दरम्यान, शिल्पाने तिच्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत काहीही शेअर केलेले नाही. राज कुंद्राची ही पोस्ट त्याच्या UT69 या पहिल्या चित्रपटाचा ट्रेलर आल्यानंतर काही दिवसांत समोर आली आहे. त्याच्या तुरुंगवासाच्या काळातील जीवनाविषयी असलेल्या या चित्रपटात राज मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये राजने म्हटले आहे की, ”फेअरवेल मास्क…आता वेगळे होण्याची वेळ आली आहे! गेल्या दोन वर्षांपासून मला सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद. माझ्या प्रवासाच्या पुढील टप्प्यावर #UT69”.

कथित पोर्नोग्राफी प्रकरणी (pornography case) राज कुंद्राला जुलै २०२१ मध्ये अटक करून मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे त्या वर्षातील सर्वात गाजलेले प्रकरण होते. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटने त्याला जामीन मंजूर केल्यावर सुमारे दोन महिने तुरुंगात घालवल्यानंतर त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये त्याची सुटका करण्यात आली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC), माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांचे असभ्य प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आपल्याला पोर्नोग्राफी प्रकरणात अडकवण्यात आल्याचा दावा राज कुंद्राने अनेकवेळा केला. आता चित्रपटाच्या माध्यमातून त्याने त्याची बाजू मांडल्याचे सांगितले जाते. UT69 चित्रपट ३ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. (Shilpa Shetty- Raj Kundra)

त्याच्या चित्रपटाबद्दल बोलताना राजने नुकतेच त्याच्या चित्रपटाची कल्पना शिल्पाला सांगितल्यावर कशी प्रतिक्रिया दिली हे उघड केले होते. त्याने न्यूज18 शी बोलताना सांगितले की, “मी शिल्पाला म्हटले की माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे आणि मी तिच्या उत्तराची वाट पाहत होतो. मला वाटते की सुरुवातीला तिला माझी ही कल्पना थोडी अवघड वाटली. कदाचित तिला वाटले असेल की हा चित्रपट बनणार नाही.”.”

“ती खूप सपोर्टिव्ह होती. तिने मला विचारले, ‘तू ॲक्टिंग कर लेगा (तू अभिनय करू शकशील का)?’ मी तिला सांगितले की मी तुरुंगात जाऊन काही पद्धतीचा अभिनय केल्यामुळे मी करु शकेन,” असे राज पुढे म्हणाला. राज आणि शिल्पा शेट्टीचे २००९ मध्ये लग्न झाले होते. त्यांना विआन आणि समिशा अशी दोन मुले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button