Sukhee : शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' चित्रपटाची चर्चा! | पुढारी

Sukhee : शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' चित्रपटाची चर्चा!

पुढारी ऑनलाईन : ‘सुखी’ ( Sukhee ) चित्रपटामधील शिल्पा शेट्टी कुंद्राच्या बोल्ड आणि फ्रेश लूकने प्रेक्षकांची जिंकली मने जिंकली आहेत. शिल्पा शेट्टी कुंद्रा ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते. सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘सुखी’मधील तिच्या लूकची चर्चा होत आहेत. शिल्पा शेट्टीने साकारलेली ही व्यक्तिरेखा खूपच कमालीची आहे.

संबधित बातम्या

‘सुखी’ ( Sukhee ) चित्रपटात शिल्पा शेट्टी कुंद्रा हिची व्यक्तिरेखा वेगळी आहे. ‘सुखी’ मधला तिचा अवतार तिच्या पूर्वीच्या भूमिकांपासून वेगळा आहे. कारण, तिचा एक फ्रेश लूक यातून बघायला मिळणार आहे. अमित साध, चैतन्य चौधरी, किरण कुमार आणि कुशा कपिला यांसारख्या अविश्वसनीय अभिनेत्यांसोबत शिल्पा स्क्रीन शेअर करणार आहे. दिग्दर्शिका सोनल जोशी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

शिल्पा शेट्टी कुंद्रा भारतीय चित्रपटसृष्टीतील तिच्या स्टायलिश अष्टपैलुत्वासाठी ओळखली जाते. ‘सुखी’द्वारे ती पुन्हा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. यामुळे या चित्रपटासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचा : 

Back to top button