Raj Kundra : शिल्‍पा शेट्‍टीचा पती धाय मोकलून रडला! म्‍हणाला," माझी मुले आणि..." (video) | पुढारी

Raj Kundra : शिल्‍पा शेट्‍टीचा पती धाय मोकलून रडला! म्‍हणाला," माझी मुले आणि..." (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्रा ( Raj Kundra ) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याची ‘UT69’ ही वेबसीरीज चाहत्याच्या भेटीस येत आहे. ही वेबसीरीज राज कुंद्राच्या जीवनावर आधारित असून मुंबईत वेबसीरीजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला झाला. या ट्रेलरच्या लॉचिंगवेळी राज कुंद्रा ‘माझी मुले आणि बायकोच्या मागे लागू नको, त्यांनी तुमचे काय बिघडवले आहे? असे म्हणत धाय माकलून रडला आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.

संबधित बातम्या  

बिझनेसमॅन राज कुंद्रा त्याच्या जीवनावरील आधारीत ‘UT69’ वेबसीरीज घेवून येत आहेत. या वेबसारीजमध्ये राजने मुख्य भूमिका साकारली आहे. नुकतेच मुंबईत या वेबसारीजच्या ट्रेलरचा लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला राज कुंद्रा यांनी दिमाखात हजेरी लावली. यावेळी राज कुंद्रा भावूक झाल्याने त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आहे. दरम्यान त्याने म्हटलं आहे की, ‘मी पोर्नोग्राफी केसनंतर तुंरूगात असताना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. तर माझे कुटूंबियांनीदेखील त्या अडचणीतून गेलं आहे. काय- काय घटना घडल्या यांची कल्पनाही करू शकत नाही. सोशल मीडियावर तर खूपच काही बोलले गेले होतें. परंतु, मी काहीही करू शकलो नाही.’

यापुढे शाहरूख खानवर निशाना साधत राज म्हणाला की, ‘भारतात फक्त दोनच गोष्टी विकल्या जातात. ते म्हणजे, शाहरुख आणि सेक्स. तर माझी पत्नी शिल्पा शेट्टी आणि मुलांच्या मागे जाऊ नका, त्यांनी तुमचे काय नुकसान केले नाही.’ असेही त्याने म्हटलं आहे. यावेळी त्याने जुन्या आठवणींना उजाळा देत खूपच रडला आहे. हा त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांच्या कॉमेन्टसचा पाऊस पडलाय.

या बेवसीरीज माध्यामातून राजच्या पोर्नोग्राफी केसमध्ये झालेली तुंरूगवास या दरम्यानचा प्रसंग दाखविण्यात आला आहे. आर्थर रोड तुंरूगात असताना घडलेल्या अडचणींचा सामना कशा केला याचे उदाहरण चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न मिर्मात्यांनी केला आहे. ‘UT69’ ही वेबसारीज ३ नोव्हेंबर २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाहनवाज अली यांनी केले आहे. तर कला दिग्दर्शन नीरज कुमार सिंग यांनी केलं आहे. वेबसारीजचे संपूर्ण शूटिंग मुंबईत पार पडले आहे. यामुळे चाहत्याचा उत्साह वाढला आहे.

हेही वाचा : 

( video : viralbhayani instagram वरून साभार )

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button