Mallika Sherawat : "मल्लिका तुझ्या हाॅट कंबरेवर चपाती भाजू शकतो" | पुढारी

Mallika Sherawat : "मल्लिका तुझ्या हाॅट कंबरेवर चपाती भाजू शकतो"

पुढारी ऑनलाईन डेस्क

बाॅलिवुडमध्ये बोल्ड भूमिका करणारी आणि आपल्या मादक अदांनी आयटम साॅंगमधून चाहत्यांना घायाळ करणारी प्रसिद्ध अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. ती सतत आपल्या करिअरवरून काही ना काही तरी खुलासे करतच असते. आज पुन्हा तिने आपल्या चाहत्यांना एका हाॅट गाण्यातील विचित्रपणाचा किस्सा सांगितला आहे.

Mallika Sherawat

‘द लव्ह लाफ लाईव्ह’ या शोमध्ये मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) आली होती. त्यामध्ये तिला करिअरसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने दिलेले उत्तर असे की, “एकदा एक निर्माता माझ्याकडे एका गाण्याची ऑफर घेऊन आला होता. मात्र, त्याच्या गाण्याबद्दल त्याची कल्पना फारच विचित्र होती. त्यामुळे मी तर त्याला सरळ स्पष्ट नकार कळविला.”

Mallika Sherawat

“तो निर्माता मला म्हणाला की, एक छान हाॅट साॅंग आहे. मात्र प्रेक्षकांना कसं कळणार की, तू हाॅट आहेस की नाही? त्यावर तो निर्माता म्हणाला की, मल्लिका तू इतकी हाॅट आहेस की मी तुझ्या कंबरेवर चपात्या भाजू शकतो. हे सगळं विचित्र आहे ना… तुम्ही कधी असं ऐकलं आहे का?”, असा विचित्र किस्सा मल्लिकाने मुलाखती दरम्यान सांगितला.

Mallika Sherawat

मल्लिका पुढे सांगते की, “मी त्या निर्मात्याला स्पष्ट नकार कळविला. मी असे काहीही करणार नाही, असंही त्याला सांगितले. खरंतर भारतात कोणाला हाॅट समजलं जातं, हे अजूनही मला समजलेलं नाही. मला हे फार विचित्र वाटतं. भारतात महिलांच्या हाॅटनेसबद्दल खूप गैरसमज आहेत. जे मला माझ्या करिअरच्या सुरुवातीला समजलेच नाहीत”, असाही खुलासा मल्लिकाने केला.

मल्लिकाने आतापर्यंत इतके किसिंग सीन्स दिले…

‘ख्वाहिश’ नावाच्या चित्रपटातून मल्लिका बाॅलिवुडमध्ये आली. तिने आतापर्यंत १७ किसिंग सीन्स दिले आहेत. ‘मर्डर’ या तिच्या चित्रपटातील बोल्ड सीन्समुळे चाहते अक्षरश: दिवाने झाले होते. मात्र, तिच्यावर नेहमीच बोल्ट भूमिकांमुळे टीका होत आली आहे. ती ‘नकाब’ सीरिजमधून प्रेक्षकांना दिसली आहे. तिने नुकताच एक इंटिमेट सीन्स दिल्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

पहा व्हिडीओ : अभिनयाबरोबरच प्रार्थना बेहरेची अनोखी कलाकारी

हे वाचलंत का? 

Back to top button