सेक्सी बिकिनीत दिशा पटानी हिचा बीचवर ग्लॅमरस अवतार ❤️❤️❤️ - पुढारी

सेक्सी बिकिनीत दिशा पटानी हिचा बीचवर ग्लॅमरस अवतार ❤️❤️❤️

पुढारी ऑनलाईन :

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी चित्रपटाबराेबरचं सोशल मीडियावरदेखील खूप ॲक्टिव्ह राहते. ती वेगवेगळ्या अंदाजातील फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते. हे तिचं चर्चेत राहण्याचं कारण म्हणता येईल. दिशा पटानी कधी डान्स तर कधी स्टंट व्हिडिओ शेअर करते. तर कधी ग्लॅमरस फोटो पोस्ट करते. त्यामुळेचं ती फॅन्सच्यामध्ये चर्चेत राहते. बुधवारी तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केलीय. या फोटोमध्ये पटानी स्टायलिश दिसते.

पटानी सेक्सी बिकिनीत खूप बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. दिशा बीचवर चिल करताना दिसतेय. असं वाटतं की, पटानीचा हा फोटो मालदीवच्या ट्रिपचा आहे. पटानीच्या या फोटोवर फॅन्सनी कौतुकाचा वर्षाव केलाय. तर काही जणांनी तिला ट्रोल केलंय. तिने आपला हा फोटो पोस्ट करताना कुठलीही कॅप्शन दिलेली नाही. पण, इंडस्ट्रीतूनही तिला कमेंट येत आहेत.

पटानीला इंडस्ट्रीत चित्रपट ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’मधून पाऊल ठेवले. आता ती ‘एक विलेन रिटर्न्स’ आणि ‘केटीना’मध्ये दिसणार आहे.

पटानीचा ‘राधे’ चित्रपट रिलीज झाला होता. यामध्ये ती सलमान खानसोबत मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेली गाणीदेखील फॅन्सच्या पसंतीस उतरली होती.

तिचे इन्स्टाग्रामवर ४७.१ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. ही अभिनेत्री नेहमी वेट लिफ्ट‍िंग आणि फ्लाईंग किक करताना दिसतेय. वर्कआउट सेशन्सचे अनेक व्हिडिओज ती फॅन्ससाठी शेअर करत असते.

बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये तिने आपली एक खास ओळख बनवलीय. तिने २०१५ मध्ये तेलुगू चित्रपट Loafer मधून तिने डेब्यू केला होता. पुढे तिने एम.एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी चित्रपट केला. याशिवाय ती बागी-२, भारत आणि मलंग यासारख्या चित्रपटांतून तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

 

अधिक वाचा-

Back to top button