Munmun Dutta : तारक मेहता फेम बबीताजीनं घेतलं अलिशान घर (Video) | पुढारी

Munmun Dutta : तारक मेहता फेम बबीताजीनं घेतलं अलिशान घर (Video)

पुढारी ऑनलाईन :

तारक मेहता का उल्टा चश्मामधील मुनमुन दत्ता अर्थातचं बबीताजीने नवं अलिथान घर घेतलं आहे. (Tarak Mehta Ka Ooltah Chashma) अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामर शेअर केला आहे. यामधये तिने आपल्य़ा घराच्या स्वप्नाविषयी सांगितलं आहे. नव्या घरात तिने फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटोशूट व्हायरल झालं आहे. या लोकप्रिय मालिकेत मुनमुन दत्ता (Munmun Dutta) ही बबीताजीची भूमिका साकारतेय. काही दिवसांपूर्वी तिने एक रॉयल घर खरेदी केलंय.

मध्यंतरी, मालिकेवरून वादात अडकलेली मुनमून पुन्हा नव्याने मालिकेत दिसलीय. आता तिने नवं घर घेतलं आहे. नव्या घरातील तिचं फोटोशूट पाहून तुम्हीही म्हणाल- ‘व्वा! क्या बात है’.

घराच्या आतील फोटो सुंदर आहेत. तिने ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती मॉडर्न अंदाजात फोटोशूट करताना दिसत आहे. मुनमून दत्ता दिवाळीला या घरात शिफ्ट झाली. या फोटोशूटमधील अभिनेत्रीच्या लूकचं तिचे फॅन्स भरभरून कौतुक करत आहेत.

आज मुनमून एका एपिसोडसाठी ३५ ते ५० हजार रुपये घेते. मुनमूनला तिचे पहिले मानधन १२५ रुपये मिळाले होते. ६ वर्षाच्या वयात तिने अभिनयात डेब्यू केला होता. मुनमूनचा जन्म १९८७ मध्ये पश्चिम बंगाल येथे दुर्गापूरमध्ये झाला होता.

या मालिकेत नेहमीच जेठालाल बबीताजीच्या मागे लागलेला असतो. तिच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करत असतो. हाचं प्रसंग मालिकेत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. जेठालाल आणि बबीता यांची जुगलबंदी देखील मालिकेत पाहायला मिळते.

Back to top button