Mallika Sherawat म्हणते, बेडरुममधील 'ती' गोष्ट बॉयफ्रेंडला आवडत नाही! | पुढारी

Mallika Sherawat म्हणते, बेडरुममधील 'ती' गोष्ट बॉयफ्रेंडला आवडत नाही!

पुढारी ऑनलाईन डेस्क

अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) हिने आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी एक खुलासा केलाय. मल्लिकाने म्हटले आहे की, ती रिलेशनशीपमध्ये आहे. पण तिने तिच्या बॉयफ्रेंडचे नाव उघड केलेले नाही. फ्रान्समध्ये आपण पहिल्यांदा बॉयफ्रेंडला भेटले होते. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करु लागलो. पण आपल्या बॉयफ्रेंडला तिची लवकर झोपी जाण्याची सवय पसंद नसल्याचे मल्लिकाने म्हटलंय.

एका मुलाखतीदरम्यान मल्लिकाला विचारण्यात आले होते की, तू इतकी व्यस्त आहेस का ज्यामुळे तुला रिलेशनशीपसाठी वेळ नाही. त्यावर तिने उत्तर दिले, ‘तसे काही नाही. माझ्यी आयुष्यात प्रेम आहे. करियरच्या सुरुवातीच्या काळात मी व्यस्त होते. पण आता मी आयुष्य आरामात आणि आनंदात जगत आहे. प्रेम माझ्या जीवनाचा खूप महत्वाचा भाग आहे.”

मल्लिका (Mallika Sherawat) पुढे म्हणाली, स्क्रीनवर मला पाहून लोकांचा माझ्याविषयी समज आहे की मी नेहमी पार्ट्या करते. ड्रिंक करते. पण खऱ्या आयुष्यात तसे काही नाही. मी खऱ्या आयुष्यात खूप अध्यात्मिक आहे. रात्री लवकर झोपण्याची मला सवय आहे. पण माझ्या बॉयफ्रेंडला ही गोष्ट आवडत नाही. त्याची माझ्या या सवयीविषयी तक्रार आहे. तू नन आहेस का?. रात्री तू लवकर झोपी जातेस. तुझी काय अडचण आहे? असे सवाल तो करत असतो.

मला पार्टी करणे आवडत नाही. तसेच मी ड्रिंक घेत नाही. मी पार्टी कल्चरपासून खूप दूर आहे. यामुळे मला रात्री लवकर झोपी जाण्याची सवय लागली आहे. पण ही गोष्ट माझ्या बॉयफ्रेंडला आवडत नसल्याचे मल्लिका सांगते.

रेकॉर्डतोड चुंबनदृश्ये देणारी मल्लिका…

असंख्य स्वप्ने घेऊन बॉलिवूडमध्ये आलेल्या मल्लिकाला बोल्ड भूमिका नको होत्या. पण, नशीब कुठे नेईल, कुणालाचं ठाऊक नसते. तिला संधी मिळाली आणि ‘बोल्ड मल्लिका’ अशी तिची प्रतिमा निर्माण झाली. मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे. ख्वाहिश चित्रपटातून मल्लिकाला प्रसिध्दी मिळाली. कारण, या चित्रपटात तिने रेकॉर्डतोड चुंबनदृश्ये दिली होती. तिला अधिक लोकप्रियता मिळाली ती ‘मर्डर’ चित्रपटातून. हॉलिवूड चित्रपट ‘अनफैथफुल’ने प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटामध्ये तिच्यावर प्रणयदृश्ये साकारण्यात आली होती.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

Back to top button