RRR ‘नाचो-नाचो’ Song: Jr. एनटीआर-राम चरणचा जाळ अन् धुर संगटच! (video) | पुढारी

RRR ‘नाचो-नाचो’ Song: Jr. एनटीआर-राम चरणचा जाळ अन् धुर संगटच! (video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : RRR ‘नाचो-नाचो’ Song : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या बहुचर्चित RRR चित्रपटाचे पहिले गाणे ‘नाचो-नाचो’ रिलीज झाले आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी नियोजित वेळेच्या एक तास आधी त्यांच्या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांसाठी युट्युबर रिलीज केले. हे गाणे आज दुपारी ४ वाजता रिलीज होणार होते. सोशल मीडियावरही त्याचा जोरदार प्रचार करण्यात आला होता. नंतर एक मोठा निर्णय घेत निर्मात्यांनी हे गाणे तो ३ वाजता रिलीज केले. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण या दोन्ही स्टार्सचं एकत्रित थिरकणं अंगावर शहारे आणणारे आहे. दोघांचा जोश भरा डान्स पाहूण आपलेही पाय आपोआपच थिरकायला लागल्याशिवाय राहत नाहीत. सोशल मीडियावर हे गाणं धुमाकूळ घालत आहे. तामिळ, तेलगु, हिंदी भाषेतील या गाण्याला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत. (RRR Song Nacho Nacho released)

नाचो नाचो गाण्याची चाल खणखणीत आणि उत्साही आहे. व्हिडिओमध्ये राम चरण आणि ज्युनियर एनटीआर एकत्र डान्स करतानाची झलकही शेअर करण्यात आली आहे. पार्श्वभूमीत चित्रपटाचा भव्य सेट दिसतो. एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासह चित्रपटाची टीम कोरिओग्राफर आणि इतर क्रू सदस्यांशी संवाद साधताना देखील दिसत आहे.

राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्या डान्सचे तोंडभरून कौतुक होत आहे ते दोघेही देशातील सर्वोत्कृष्ट डान्सर पैकी एक आहेत. ते चाहत्यांच्या हृदयवर राज्य करतात. त्यांना मोठ्या स्क्रिनवर पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो, अशी प्रतिक्रिया अनेक चाहत्यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच ‘RRR’ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. टीझरमध्ये ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि अजय देवगण रणांगणात दिसत होते. आलिया भट्टचीही एक झलक पाहायला मिळाली. एसएस राजामौली यांनी अलीकडेच सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. राजामौली यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट शेअर केली आणि सांगितले की RRR हा चित्रपट आता ७ जानेवारी २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले ज्यामध्ये अजय देवगण, रामचरण, जूनियर एनटीआर आणि आलिया भट्ट दिसले.

‘बाहुबली’ दिग्दर्शक एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांच्या अगामी RRR चित्रपटाची सर्वांनाच प्रतिक्षा लागलेली आहे. काही महिन्यांपूर्वी राजामौली यांनी RRR च्या मेकिंगचा व्हिडीओ रिलीज केला होता. या मेकिंग व्हिडीओमध्ये भव्य सेट, आगीचे लोट आणि काम करणारे शेकडो लोक दिसत आहेत. व्हिडीओमध्ये असे दिसते आहे की, राजामौली चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष ठेवून आहेत. राजामौली या चित्रपटावर खूप मेहनत घेताना दिसत असून, व्हिडीओ बाहुबलीची आठवण करुन देणारा आहे. चित्रपटाविषयी बोलायचे तर, याची कथा प्रत्येकाला देशभक्तीच्या रंगात रंगवण्यासाठी पुरेशी आहे.

हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर OTT प्लॅटफोर्मवरही रिलीज करण्यात येणार आहे. झी 5 तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या चित्रपटाचे डिजिटल स्ट्रीमिंग पार्टनर आहेत. याशिवाय नेटफ्लिक्सवर हिंदी डब चित्रपट पहायला मिळणार आहे. त्याचबरोबर, झी सिनेमा हिंदी, स्टार प्लस तेलुगु, स्टार प्लस तमिळ, एशियनेट मल्याळम, स्टार कन्नड हे सॅटेलाईट भागीदार आहेत. डिजिटल प्रवाह भागीदार (परदेशी भाषांमध्ये इंग्रजी, कोरियन, तुर्की आणि स्पॅनिश) नेटफ्लिक्स आहेत.

राम चरणने पोस्ट शेअर केली…

अभिनेता राम चरणने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नाचो नाचो गाण्याच्या रिलीजची माहिती दिली आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले – या मास बीटवर नाचण्यापासून स्वत:ला थांबवू शकत नाही. माझा भाऊ ज्युनियर NTR सह RRR मास अँथम. हे गाणे रिलीज झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)

Back to top button