सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीप-गौरी यांचा रंगणार कबड्डी सामना | पुढारी

सुख म्हणजे नक्की काय असतं : जयदीप-गौरी यांचा रंगणार कबड्डी सामना

पुढारी ऑनलाईन :

स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गमावलेली प्रॉपर्टी पुन्हा मिळवायची असेल तर शिर्के-पाटील कुटुंबासमोर सध्या एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे शालिनीविरुद्ध कबड्डीचा सामना जिंकणं. यासाठी संपूर्ण कुटुंबाने एकत्र येत मेहनत घेतली आहे. भैरु कोचच्या मार्गदर्शनाखाली जोरदार सराव करत आता अंतिम सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत कबड्डीच्या संघात किमान सात खेळाडू असणं बंधनकारक असतं. त्यामुळे ऐन मोक्याच्या क्षणी गौरीने मैदानात एण्ट्री घेत कबड्डीच्या सामन्यात नवा ट्विस्ट आणला आहे. त्यामुळे हा सामना उत्कंठावर्धक असणार यात शंका नाही.

या सामन्याच्या निमित्ताने गौरीचं नवं रुप पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. तिच्यातला आत्मविश्वास, जिद्द आणि चिकाटी शिर्के-पाटील कुटुंबाला त्यांचे समृद्ध दिवस पुन्हा मिळवून देईल याची खात्रीही आहे.

गौरी जयदीप विरुद्ध शालिनीचा संघ असा हा चुरशीचा सामना नक्की पाहा रविवार १४ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता २ तासाच्या महाएपिसोडमध्ये फक्त स्टार प्रवाहवर.

Back to top button