India’s Best Dancer ३ : क्यूट समर्पण लामा ठरला विजेता; मिळविले तब्बल १५ लाख | पुढारी

India's Best Dancer ३ : क्यूट समर्पण लामा ठरला विजेता; मिळविले तब्बल १५ लाख

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ची ( India’s Best Dancer ३ ) ट्रॉफी पुण्याच्या समर्पण लामा याने जिंकली आहे. ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’ ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरल्यामुळे त्याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहेत. समर्पण लामाला ट्रॉफीसह १५ लाख रुपयांचा मिळाले आहे.

संबधित बातम्या 

अभिनेते गोविंदा आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या उपस्थितीत ‘इंडियाज बेस्ट डान्सर 3’चा ( India’s Best Dancer ३ ) ग्रँड फिनाले सुरू झाला. या कार्यक्रमात पुण्याच्या समर्पण लामासह शिवांशू सोनी, अंजली ममगाई, विपुल कंदपाल आणि अनिकेत चौहान या स्पर्धकाचा टॉप ५ मध्ये समावेश होता. या स्पर्धकामधून अखेर विजेता म्हणून समर्पण लामा याच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान त्याला ट्रॉफीसह १५ लाख रूपये देण्यात आले. यानंतर त्याच्या चाहत्यांसह कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला.

दरम्यान या कार्यक्रमात समर्पण लामा याचा कोरिओग्राफर भावना खंडुजा यांना बक्षीस देवून सन्मानित करण्यात आले आहे. कोरिओग्राफर भावना खंडुजा यांना ५ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. कारण इंडियाज बेस्ट डान्सर या शोच्या मंचावर स्पर्धक त्यांच्या नृत्यदिग्दर्शकांसोबत परफॉर्म केले जाते. यामुळे दोघां जणावरही चाहत्यासह सर्वजण भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button