पुढारी ऑनलाईन डेस्क : वजनदार, टाईमपास यासारख्या चित्रपटातून (Priya Bapat) आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवणारी अभिनेत्री प्रिया बापटने खुलेआम प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत सोबत रोमँटिक मूडमध्ये ती दिसतेय. प्रियाने काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रिया बापट उमेशसोबत रोमँटिक मूडमध्ये दिसतेय. (Priya Bapat)
संबंधित बातम्या-
तिने हे फोट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय- सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं मला भयंकर आवडतं ?
तळटीप – खूप आवडीच्या गोष्टीला "भयंकर आवडणे" ही उपमा माझी काकू द्यायची. "भयंकर" या शब्दाचा असाही वापर ?
खरंतर प्रियाने उमेशला किस करतानाचे हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोवंर सोशल मीडिया युजर्सनी कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अभिनेत्रीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने, "आई गं…आजचा दिवस सुंदर जाणार सकाळ सकाळ एवढे सुंदर चेहरे पाहिले". आणखी एकाने लिहिलं-ए इधर उधर देखो भई.. ??????. दुसऱ्या एका युजरने म्हटलंय- "असं मुक्तपणे जगता आलं पाहिजे". आणखी काही नेटकरी म्हणताहेत की- God bless you both ❤️, कमाल, बहार ???, I love your jodi guysss ❤️❤️, कमाल डायलॉग कालच्या नाटकाचे….?? @priyabapat तुझा अभिनय कमाल…, कित्ती गंs गोड ते… Love you both ❤️, Looking forward to watch jar tar chi goshta on sunday…. ??, मला तुमची जोडी भयंकर आवडते…Stay Blessed ❤️, काय वाईट आहे त्यात ….god bless you both ????❤️❤️, मला ही सगळ्यांसमोर प्रेम व्यक्त केलेलं भयंकर आवडतं ❤️❤️, Priya bapat with least famous person ?
प्रिया बापटने मराठी चित्रपटांशिवाय हिंदी चित्रपटांमध्येदेखील अभिनय केला आहे. तिने संजय दत्तसोबत 'मुन्नाभाई MBBS' मध्ये काम केलं होतं. 'मुन्ना भाई'चे शूटिंग करताना ती कॉलेजमध्ये शिकत होती. तिच्या शिक्षकाने तिला कॉलेज विद्यार्थिनीची भूमिका साकारायला सांगितले होते. मग तिने राजकुमार हिरानीच्या चित्रपटासाठी ऑडिशन दिलं आणि तिली भूमिका मिळाली होती.